आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुँछमध्ये भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा गोळीबार, 24 तासांत तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी सैन्याने गेल्या २४ तासांत तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. पुँछमध्ये अद्यापही काही भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय जवानांकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. 

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून ८२ एमएम मॉर्टर्स आणि अत्याधुनिक बंदुकीतून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पुँछ जिल्ह्यातील एलओसीवरील कृष्णा घाटी सेक्टरमधील चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. दरम्यान पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...