आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचा गोळीबार सुरूच; भारताचे दोन जवान जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पूंछ जिल्ह्यात गोळीबार सुरूच ठेवला. मेंढर, बालाकोट आणि मनकोट भागात भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यात लष्कराच्या २१ पंजाब रेजिमेंटचे दोन जवान जखमी झाले आहेत. गोळीबारात दोन घरेही पूर्णपणे जमीनदोस्त झाली. भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले, पण पाकचे किती नुकसान झाले याची माहिती मिळाली नाही.

पाकिस्तानने सकाळी पूंछ जिल्ह्यातील तीन क्षेत्रांत एकाच वेळी गोळीबार सुरू केला. लष्करी चौक्यांसह नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करण्यात आले. दिवसभर सुरू असलेला गोळीबार संध्याकाळीही सुरूच होता. कुपवाडा जिल्ह्यातील मछेल क्षेत्रातही चौक्यांवर तोफांनी हल्ला करण्यात आला. त्यात ८२ मिमी मॉर्टरचा वापर करण्यात आला. गोळीबारामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कडक सुरक्षा व्यवस्था आहे.

चकमकीत दहशतवादी ठार : शोपिया जिल्ह्यातील वानगाम येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्याचे नाव सद्दाम मीर असून तो छत्रीपोराचा रहिवासी आहे. तो तीन महिन्यांपूर्वीच हिजबुलचा सदस्य झाला होता.
बातम्या आणखी आहेत...