आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडून गोळीबार, एक जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पुंछ जिल्ह्यातील सीमारेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. रछपाल सिंह असे या जवानाचे नाव असून गुरुवारी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने जगाचा निरोप घेतला.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रबंदीचे उल्लंघटन सुरू आहे. आयबी तसेच सीमारेषेवरील लष्करांच्या चौकींना निशाना बनवत पाकडून सतत गोळीबार केला जात आहे. बुधवारी रात्री पुंछजवळील सीमारेषेवरील कृष्णा खोरे भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्करानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यादरम्यान एक जवान शहिद झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी लष्कराने संपूर्ण भागात शोधमोहिम राबवली. परंतु, यात घूसखोरीची कोणतही माहिती मिळाली नाही. दरम्यान, बुधवारी कुपवाडा जिल्ह्याच्या सीमारेषेवरही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्कर कारवाईस सज्ज झाले आहे.