आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Firing,Border Villagers Leave The House

LIVE PICS : गोळीबारानंतर सीमेवरील 5000 भारतीयांनी सोडली घरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाकिस्तानी सैन्याकडून होणा-या गोळीबारामुळे पळून जाणा-या महिला आणि मुले.)

जम्मू - पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारामुळे दोन दिवसांत सीमेवरील गावे रिकामी होण्यास सुरुवात झाली आहे. आरएस पुरा सेक्टरमधील सीमेवरील गावांमधून आयटीआय कॉलेजमध्ये आलेल्या लोकांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सैन्याने दोन दिवसांपूर्वीच लाऊड स्पीकरवर घोषणा करून त्यांच्या गावातील नागरिकांना दुसरीकडे हलवले होते. त्यामुळे परिस्थिती बिघडणार हे नागरिकांना आधीच समजले होते.
आपले अधिकारी असे काही सांगत नाही. जेव्हा परिस्थिती चिघळते तेव्हा ते सीमेवरील गावे रिकामी करायला सांगतात. आरएस पुरा सेक्टरच्या अब्दुल्लिया, कोरूटाना खुर्द, कोरूटाना बस्ती, चंदूचक, लाईया आणि विधीपूर जटटा या सहा गावांतील नागरिकांनी गावातून पळ काढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कॉलेजच्या छतावर काढली रात्र
गाव सोडलेल्या या गावक-यांनी कॉलेजच्या छतावर संपूर्ण रात्र काढली आहे. विस्थापित झालेल्यांना राहण्यासाठी आरएस पुरा येथील दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात आयटीआय कॉलेज आणि रंगपूर शाळेचा समावेश आहे. शुक्रवारी प्रशासनाच्या वतीने खाण्यापिण्याची काहीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. शनिवारपासून सर्व व्यवस्था होणार असल्याचे अधिकारी म्हणाले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गाव सोडून आलेल्या नागरिकांचे फोटो...