आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने पाठवला मानवी बॉम्ब ! भारतीय लष्कराच्या चौकीजवळ स्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुंछ - पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर होत असलेले हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले आहे. आता तर, भारतीय सीमेजवळ मानवी बॉम्ब पाठवण्याची नापाक कामगिरी पाकिस्तानने केली आहे. आज (सोमवार) दोन्ही देशांच्या सीमेजवळ पाकिस्तानातून आलेल्या एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवून दिले. ही घटना जम्मू-काश्मिरच्या पुंछ येथील भारतीय लष्कराच्या चौकीजवळ घडली आहे.

पुंछ येथील सजौन येथे पाकिस्तानी मानवी बॉम्बने शरीरावर आयईडी स्फोटके लावली होती. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, सैनिकांनी चौकीजवळ एका व्यक्तीला पाहिले होते. सैनिकांनी त्याला तिथेच थांबण्याची सुचना केली. त्यानंतर त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. त्यानंतर अचानक त्याचा स्फोट झाला. सैनिकांच्या गोळीबाराने त्याच्या शरीरावरील स्फोटकांचा स्फोट झाला की, त्याने स्वतः स्फोट घडवून आणला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुसरीकडे आजच (सोमवारी) दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांची एक टोळी आणि गस्त पथका दरम्यान झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे तर, तीन जण जखमी आहेत. पुलवामामध्ये दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये बराचवेळ चकमक झडली. या गोळीबारात एक दहशतवादीही मारला गेला आहे. एका पोलिस अधिका-याने सांगितले की, दोन किंवा तीन दहशतवादी होते. त्यांनी गोळीबार सुरु केला होता.