आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान अद्याप काेमात - पर्रीकर; उरी ब्रिगेड कमांडरला हटवले;

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकची तुलना ‘सर्जरीनंतर कोमात गेलेल्या रुग्णा’शी केली. पाकची अवस्था कोमातील रुग्णासारखी असून सर्जरी झाली आहे, याचाही त्याला थांगपत्ता नाही. सर्जिकल स्ट्राइकच्या दोन दिवसांनंतरही नेमके काय घडले हेही पाकला माहिती नाही, असे पर्रीकर म्हणाले.

पर्रीकर शुक्रवारी उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात होते. तेथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारताला शांतता अधिक प्रिय आहे. अनावश्यक हल्ल्यांवर भारताचा विश्वास नाही. भारताच्या सैनिकांना पलटवार करायचे माहीत आहे. या सर्जिकल स्ट्राइकचा उद्देश पाकिस्तानला संदेश देणे होता. भारतीय लष्कराची हनुमानाशी तुलना करताना पर्रीकर म्हणाले की, सर्जिकल स्ट्राइकमुळे सैनिकांना त्यांच्या क्षमतेचा अंदाज आला. तर काय प्रतिक्रिया द्यायची हे पाकिस्तानला कळलेही नाही.

हल्ल्यानंतर उरी ब्रिगेड कमांडरला हटवले

श्रीनगर | पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या संवेदनशील उरी ब्रिगेडच्या कमांडरला भारतीय लष्कराने या ब्रिगेडमधून हलवले असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...