आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Is Spying On Borders By Camera In Jodhpur

पाककडून भारताची हेरगिरी, राजस्थान बॉर्डरवर बसवले CCTV कॅमेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाकिस्तान बॉर्डर झुडपांमध्ये पाकिस्तान लष्कराने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरा - Divya Marathi
भारत-पाकिस्तान बॉर्डर झुडपांमध्ये पाकिस्तान लष्कराने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरा
जोधपूर- पाकिस्तान भारताविरोधात एका पाठोपाठ एक कुरापत करत आहे. वारवांर शस्त्रसंधीचे उल्लेघंन करणार्‍या पाकिस्तानने आता चक्क आंतरराष्ट्रीय नियमाची पायमल्ली केली आहे. पाकिस्तानने भारताची हेरगिरी करण्‍यासाठी राजस्थानच्या सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने कडाडून विरोध केल्यानंतरही पाकिस्तान- भारत आंतरराष्ट्रीय सीमेपासून 200-300 मीटर अंतरावर हे कॅमेरे बसवले आहेत.

बीएसएफने पाक रेंजर्सकडे या प्रकरणी विचारणा केली आहे. परंतु पाकिस्तानकडून त्यावर अद्याप खुलासा झालेला नाही. डीआयजी किंवा आयजी स्तरावरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्‍यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
चार जिल्ह्यांच्या सीमेवर कॅमेरे बसवले...
राजस्थानातील बाडमेर, जैसलमेर, बीकानेर आणि श्रीगंगानगरच्या भारतीय सीमेवरील लष्काराच्या चौक्यांसमोर पाकने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचे काम जोरात सुरु आहे. कॅमेरे बसवण्यासाठी सीमेवर पलिकडून 15-15 फूट उंच पोल उभे करण्‍यात आले आहेत. तसेच झुडपांमध्येही कॅमेरे बसवले आहेत.
चायना टेक्नॉलॉजीचा वापर...
भारताच्या आंतराष्ट्रीय सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना पाकिस्ताने चायना टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. पोलवर सोलर पॅनल देखील बसवण्यात आले आहे. कॅमेराची रेंज एक किलोमीटर पेक्षा जास्त आहे.
यापूर्वी यूएव्ही आता सीसीटीव्ही कॅमेरे
पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्याचप्रमाणे सीमेवरील घुसखोरीला पाकिस्तान खतपाणीही घालत असल्याचे या सीसीटीव्ही कॅमेरांवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पाक लष्काराने गेल्या एप्रिल महिन्यात यूएव्हीने (मानवरहित विमान) भारतीय सीमेवर रात्री टेहाळने केली होती. यूएव्ही झिरो लाइनच्या 300 ते 500 मीटर उंचीवरून गेले होते.
आंतरराष्ट्रीय सीमा नियमानुसार दोन्ही देशांच्या सीमेवर 500-500 मीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरा तसेच इतर कोणतेही उपकरणाचा वापर करता येत नाही.
भारताच्या पश्चिम सीमवर पलिकडून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. बीएसएफने पाकिस्तान कडाडून विरोध केला आहे. वरिष्ठ पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचे राजस्थान बीएसएफचे डीआयजी व प्रवक्ता रवी गांधी यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अशाप्रकारे पाकिस्तान करतोय भारताची हेरगिरी...