आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan, ISIS And Let Flags Seen In Jammu Kashmir Again

श्रीनगर : पुन्हा दिसले पाकिस्तान, ISIS चे झेंडे, पोस्टरवर बगदादीचा फोटोही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ISIS चा म्होरक्या बगदादी याचे श्रीनगरमध्ये पोस्टरही दिसून आले... पाहा व्हिडिओ... - Divya Marathi
ISIS चा म्होरक्या बगदादी याचे श्रीनगरमध्ये पोस्टरही दिसून आले... पाहा व्हिडिओ...
श्रीनगर - भारत-पाकिस्तानदरम्यान रविवारी होणाऱ्या NSA बैठकीच्या आधीच वातावरण तापले आहे. पाकिस्तानमध्ये ट्विटर यूझर्सने भारताचे NSA अजित डोभाल यांना 'शैतान' ठरवले आहेत. तर वहीं जम्‍मू-काश्‍मीरमध्ये पाकिस्‍तान, ISIS आणि लश्कर-ए-तोयबाचे झेंडे आढळले. गेल्यावेळी झेंड्यावर ISIS जम्मू काश्मीरात लवकरच येत असल्याचे लिहिलेले होते. यावेळी झेंड्यावर ISIS चा म्होरक्या असलेल्या बगदादीचा फोटोही आढळला आहे. तसेच फुटीरतावादी नेते भारत सरकारच्या विरोधानंतरही रविवारी पाकिस्‍तानचे NSA सरताज अजिज यांना भेटण्याच्या मुद्यावर अडून आहेत. पाकिस्ताननेही ठरल्यानुसार फुटीरतावाद्यांना भेटणार असल्याचे म्हटले आहे.

सलग सहाव्या शुक्रवारी दिसले ISIS, लश्कर आणि पाकिस्तानचे झेंडे
शुक्रवारी (21 ऑगस्ट) ला श्रीनगरमध्ये झेंडे दाखवण्याचा हा प्रकार सलग सहाव्या शुक्रवारीही करण्यात आला आहे. याआधी केव्हा झेंडे दाखवले होते ते पाहुयात...

- 17 जुलै : शुक्रवारी श्रीनगरच्या नोहट्टा परिसरात एका मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर लोकांनी आंदोलन केले. आंदोलकांनी ISIS आणि लस्कर ए तोयबाचे झेंचे दाखवले.
- 24 जुलै : श्रीनगरच्या जामिया मशिदीत नमाजनंतर काही जण ISIS चा झेंडा घेऊन आलेले दिसले. त्यांनी सर्वांनी मास्क घातलेले होते.
- 31 जुलै : त्याच मशिदीबाहेर नमाजनंतर पुन्हा अशाच प्रकारे ISIS आणि लश्करचे झेंडे दाखवण्यात आले.
- 7 ऑगस्ट : श्रीनगरच्या जामिया मशीद परिसरात पुन्हा एखदा इस्लामिक स्टेट आणि पाकची दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे झेंडे दिसून आले. जे झेंडे दाखवण्यात आले त्यावर IS लवकरच JK मध्ये येत असल्याचा मजकूर होता.
- 14 ऑगस्ट : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी जम्‍मू-काश्‍मीरच्या श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तानी झेंडे पाहायला मिळाले. फुटीरतावादी नेत्या दुख्तरान-ए-मिल्लत च्या प्रमुख आसिया अंद्राबी यांनी खुलेआम पाकिस्तानी झेंडा लावला आणि भाषणही केले. श्रीनगरमध्ये एका ठिकाणी IS चा झेंडा दिसून आला.

12 तरुणांचा ग्रुप
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते ISIS आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्याच्या या प्रकारामागे 12 तरुणांचा ग्रुप आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते इंटलीजन्स इनपुट आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तसेच फोटोंच्या आधारे या ग्रुपशी संबंधित लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर, नजर ठेवली जात असल्याचेही सांगितले जात आहे. या ग्रुपला फंडींग कुठून होते, याचाही शोध घेतला जात आहे.

इंडियन मुजाहिदीन करत आहे IS साठी भरती
काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार ISIS साठी भरती करणाऱ्या 70 ते 75 जणांवर भारतीय गुप्तचर संस्थांचे लक्ष्य आहे. ISIS मध्ये भरती झालेले इंडियन मुजाहिदीनचे काही लोक भारतात भरती करण्यासाठी काही जणांशी संपर्क करत आहेत. गुप्तचर अधिकाऱ्यांनीही असे हँडलर्स भारतात असल्याची कबुली दिली आहे. हे अधिकारी तेलंगणामध्ये गेल्या एका वर्षात 17 तरुणांना IS मध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात यश मिळवलेल्या टीममधील आहेत.

पुढील स्लाइड्सव पाहा, संबंधित PHOTOS