आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमध्‍ये पुन्हा पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे फडवण्‍यात आले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसआयएस दहशतवादी संघटनेचा प्रमुख बगदादीचे पोस्टर दिसली. - Divya Marathi
आयएसआयएस दहशतवादी संघटनेचा प्रमुख बगदादीचे पोस्टर दिसली.
श्रीनगर - भारत-पाकिस्तान दरम्यान रविवारी (ता.23) होत असलेल्या राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चर्चेपूर्वीच वातावरण बिघडले. पाकिस्तानी नागरिकांनी ट्विटरवर भारताचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांना शैतान म्हणून संबोधले. दुसरीकडे जम्मू-काश्‍मीरमध्‍ये पाकिस्तान, आयएसआयएस आणि लष्‍कर-ए-तोयबा यांचे झेंडे फडकवण्‍यात आले. यापूर्वी झेंड्यांवर लवकरच जम्मू-काश्‍मीरमध्‍ये आयएसआयएस येत असल्याचे घोषणा लिहिण्‍यात आली होती. यावेळी त्यांच्या झेंड्यावर दहशतवादी संघटनेचा प्रमुख बगदादीचा फोटो दिसत आहे. फुटीरवादी नेते भारत सरकारचा विरोध असतानाही रविवारी पाकिस्तानचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज यांची भेट घेणार आहे. नियोजनानुसारच फुटीरवादी नेत्यांची भेट घेतली जाईल, असे पाकिस्तानने स्पष्‍ट केले आहे.

काही महत्त्वाच्या घटना:
-17 जुलै: शुक्रवारी श्रीनगरच्या नोहट्टा भागात एका मशिदीत शुक्रवारीच्या नमाजानंतर गोंधळ झाला. आंदोलकांनी आयएसआयएस आणि लष्‍कर-ए-तोयबाची झेंडे फडकवले.
24 जुलै : श्रीनगरच्या जामिया मशिदीत नमाजानंतर काही लोकांनी आयएसआयएसचा झेंडा फडकवला. हे काम करणा-यांनी तोंडाला मास्क बांधले होते.
-31 जुलै: या मशिदीच्या बाहेर नमाज झाल्यानंतर आयएसआयएस आणि लष्‍कर-ए-तोयबाचे झेंड दिसले.
-7 ऑगस्ट - श्रीनगरच्या जामिया मशिदीत पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्‍कर-ए-तोयबाचे झेंडे फडकवले गेले. त्यावर लिहिले होते, IS JK लवकरच येत आहे.
- 14 ऑगस्ट: पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी श्रीनगरच्या अनेक भागात पाकिस्तानी झेंडे फडकवण्‍यात आले.
12 तरुणांचा गट या घटनांमागे
पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयएस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्‍यामागे 12 तरुणांचा गट कार्य‍रत आहे. इंटेलिजन्स इनपुट आणि सीसीटीव्ही फुटेज आणि फोटोच्या आधारावर या गटाशी संबंधितांची ओळख पटली आहे. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्‍यात येत आहे.

पुढे पाहा संबंधित फोटोज...