आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Military Break Casefire In Kashmir, Divya Marathi

काश्मीरमध्‍ये पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा एकदा केले युद्धबंदीचे उल्लंघन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले. मेंढर सेक्टरमध्ये पाककडून भारतीय तळावर जोरदार गोळीबार करण्यात आला. मात्र, भारतीय लष्कराने त्यास चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला परतवून लावला. चालू महिन्यात दहाव्यांदा पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी जवानांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गोळीबाराला सुरुवात केली. सुमारे अर्धा तासापर्यंत हा गोळीबार सुरू होता. पाकच्या या कृत्याचा भाजपने निषेध केला असून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.