आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan National Anthem Played During Local Cricket Match In South Kashmir Pulwama, Video Goes Viral

जम्मू काश्मीरमध्ये क्रिकेटपटूंनी गायिले पाकिस्तानचे राष्ट्रगीत, सोशल मीडियावर केले लाइव्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या आधी स्थानिक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचे (पाक व्याप्त काश्मीर) राष्ट्रगीत गायिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर हा प्रकार सोशल मीडियावरही लाइव्ह करण्‍यात आला. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोन्ही संघाचे क्रिकेटपटू राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत.

दरम्यान, याआधी काश्मीरमधील गांदरबल येथे एका क्रिकेट मालिकेत क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेट संघासारखा यूनिफॉर्म परिधान केला होता. तसेच पाकचे राष्ट्रगीत गायले होते. नंतर पोलिसांनी सर्व क्रिकेटर्सला ताब्यात घेतले होते.

न्यूज एजन्सीनुसार, ही घटना 21 मेची आहे. एका क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलच्या सुरुवातीला दोन्ही संघाच्या क्रिकेटपटूंनी पीओकेचे राष्ट्रगीत गायिले. शायनिंग स्टारविरुद्ध पुलवामा टायगर्स यांच्यात ही लढत झाली होती. व्हिडिओमध्ये दोन्ही संघातील क्रिकेटपटूंनी ब्लू जर्सी परिधान केलेले दिसत आहेत.
- स्टेडियमजवळ पुलवामा डिग्री कॉलेज आहे. कॉलेजमधील विद्यार्थी खोर्‍यात तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना कायम विरोध करत असतात.

पोलिसांनी सुरु केली चौकशी...
- काश्मीरमध्ये पीओकेचे राष्‍ट्रगीत गायिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

क्रिकेटर्सने परिधान केली होती पाकसारखा यूनिफॉर्म
- गांदरबलमध्ये 2 एप्रिलला झालेल्या क्रिकेट सामन्यात स्थानिक क्रिकेटपटूंनी पाकिस्तान क्रिकेट संघासारखा यूनिफॉर्म परिधान केला होता. त्याचबरोबर सामना सुरु होण्याआधी पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायिले होते. नंतर पोलिसांनी सर्व क्रिकेटपटूंना ताब्यात घेतले होते.
- गांदरबल येथील स्टेडियमच्या शेजारीच पोलिस स्टेशन आहे. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्‍यात आली होती.

काश्मीरी म्युझिशियननेही गायिले होते पाकचे राष्ट्रगीत...
- काश्मीरमध्ये दोन म्युझिशियनने ट्रेडिशनल इंस्ट्रूमेंट्ससोबत पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायिले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

पुढील स्लाइडवर पाहा.. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...