आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्‍या पंतप्रधानांनी पुन्‍हा ओकली गरळ, म्‍हणाले बु-हाण वानीमुळे काश्‍मीर लढ्याला बळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाझ शरीफ यांनी भारताविरुध्द गरळ ओकली. - Divya Marathi
नवाझ शरीफ यांनी भारताविरुध्द गरळ ओकली.
नवी दिल्ली- हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर असलेला दहशतवादी बुऱ्हान वानी याच्या एन्काऊंटरला एक वर्ष पुर्ण झाले आहे. गेल्या वर्षी 7 जुलैला एन्काऊंटर करुन बुऱ्हान वानीला कंठस्नान घालण्यात आले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ही संधी साधत आज भारताविरुध्द गरळ ओकली.

काय म्हणाले नवाझ शरीफ
- नवाझ शरीफ यांनी बुऱ्हान वानी या दहशतवाद्याला श्रद्धांजली अर्पण केली आणि पाकिस्तानची या दहशतवाद्यांना पाठबळ असल्याचे कबुल केले. तसेच बुऱ्हान वानीमुळे काश्‍मीर लढयाला बळ मिळाले असेही नवाज शरीफ म्‍हणाले.
- भारत हा काश्मिरी नागरिकांचा आवाज दाबत असल्याचा कांगावाही त्यांनी केला. 
- पाकिस्तानचा नैतिक, राजकीय पाठिंबा काश्मिरातील फुटिरतावाद्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. 
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची व काश्मिरात सार्वमत घेण्याची मागणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...