आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानने काढले दोन सेक्‍टरमधील कॅमेरे ; चीनने कुरापत केल्‍याचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत पाकिस्‍तान सीमेवर पाकिस्‍तानने झुडपात लावलेले कॅमेरे - Divya Marathi
भारत पाकिस्‍तान सीमेवर पाकिस्‍तानने झुडपात लावलेले कॅमेरे
जोधपूर (राजस्‍थरान) - पश्चिम राजस्थान लगत असलेल्‍या अंतरराष्ट्रीय सीमेवरील झिरो लाइन जवळ पाकिस्तानने सीसीटीव्‍ही कॅमरे लावले होते. यासाठी त्‍यांना चीनने मदत केल्‍याचा अंदाज आहे. याला भारताने विरोध केल्‍याने पाकिस्तानी रेंजर्सने बि‍कानेर आणि जैसलमेर सेक्टरमधील काही कॅमेरे हटवले. मात्र, बाडमेर सेक्टरसारख्‍या संवेदनशील भागात अजूनही कॅमेरे लावलेले आहेत. या बाबत बीएसएफ मुख्यालयाने केंद्रीय गृह मंत्रालयला सविस्‍तर अहवाल पाठवला आहे. बीएसएफ-पाकिस्‍तान रेंजर्स यांचे प्रमुख आणि दोन्‍ही देशांचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार यांच्‍या बैठकीमध्‍ये हा मुद्दा उचलला जाणार आहे.
चीनचा हात?
सीमेपलीकडे असलेल्‍या पाकिस्तानच्‍या आधुनिक नाहीत. या ठिकाणी तंत्रज्ञानांचा अभाव आहे. दरम्‍यान, चीनच्‍या सहका-याने पाकिस्‍तानाने ही कुरापत काढली असावी, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. यापूर्वीही पाकिस्‍तानने चीनच्‍या मदतीने झिरो लाइनवर खोखरापार रेल्‍वे स्टेशन बनवले आहे. शिवाय सीमा क्षेत्रात रस्‍त्‍यांचे कामही सुरू आहे. आता चीन बनावटीचे सीसीटीव्‍ही कॅमरे लावले. या कॅमे-यांना कुठून कंट्रोल केले जाते, याचा शोध बीएसएफ घेत आहे.

दबाव वाढला तर दोन पावले मागे
> पाकिस्‍तानाकडून घुसखोरी आणि तस्करी होते. दरम्‍यान, आता त्‍यांना झिरो लाइन जवळ सौर ऊर्जा पॅनलचे सीसीटीव्‍ही कॅमरे लावले. ते हटवावे, यासाठी बीएसएफकडून त्‍यांच्‍यावर दबाव टाकला गेला.
> दबाव वाढल्‍यानंतर पाकिस्‍तानने बि‍कानेर सेक्टर आणि जैसलमेरच्‍या एका सेक्टरमधून कॅमेरे हटवले. या ठिकाणी जास्‍त कॅमेरे लावले होते. मात्र, बाड़मेर सेक्टरमधील कॅमेरे अजून काढले नाहीत.
पुढील स्‍लाइडवर पाहा पाकिस्‍तानने लावलेले कॅमेरे.