आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Not To Mention Hafiz Saeed's Name In 26 11 Chargesheet, Lakhwi Mastermind

पाकच्या 26/11 च्या चार्जशीटमध्ये सईदचे नावच नाही, लखवीला ठरवले मास्टरमांइंड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : हाफिज सईद

मुंबई - मुंबईवर झालेल्या दहशतावादी हल्ल्याप्रकरणी (26/11) पाकिस्तानने तयार केलेल्या चार्जशीटमध्ये मास्टरमाइंड हाफिज सईद याचे नावच नाही. नवाज शरीफ सरकारने हाफीजला क्लीनचीट दिली आहे. त्याच्याऐवजी लश्कर ए तय्यबा चा कमांडर जकीउर रहमान लखवी हा मास्टरमाइंड असल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी या प्रकरणी पाकिस्तानात सुरू असणारी सुनावणी स्थगित केल्याने भारताने तीव्र भूमिका मांडली होती. या प्रकरणी भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही बोलावले होते. इंग्रजी वृत्तपत्र मेल टुडेतील वृत्तानुसार, पाकिस्तानने सादर केलेल्या चार्जशीटमध्ये लश्कर-ए-तय्यबा संस्थापक आणि जमात-उद दावाचा प्रमुख हाफीज सईद यांची नावे नाहीत. भारतीय गुप्तचर आणि तपास संस्थांनी मात्र सईद हाच मास्टरमाइंड असल्याचे वारंवार म्हटले आहे. पाकिस्तानी आरोपपत्रात लश्करचा कमांडर जकीउर रहमान लखवी याला मास्टरमाइंड ठरवण्यात आले आहे. लखवीने इतर दहशतवाद्यांच्या मदतीने कराचीमध्ये दहशतवाद्यांसाठी ट्रेनिंग कॅम्प सुरू केले, त्याचठिकाणी कसाबला ट्रेनिंग देण्यात आली, असे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
VOIP कनेक्शन द्वारे मिळत होते निर्देश
पाकिस्तानच्या आरोपपत्रानुसार, जमीन अहमद आणि युनूस अंजूमने मुंबई हल्ल्याच्या फंडिंगसाठी 39 लाख 40 हजार रुपये बँकेतून काढले. मजहर इकबाल आणि अब्दुल वाजिद VOIP कनेक्शनद्वारे हल्लेखोरांना निर्देश देत होते.

सर्वकाही उलटे
भारताच्या आरोपपत्रात अबू हमजा उर्फ अबू जिंदाल कराची हल्लेखोरांना निर्देश देत होता, असे म्हटले आहे. तसेच सईदसह लश्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानी सैन्याचे दोन अधिकारी मेजर इकबाल आणि मेजर समीर अली हल्ल्याचे मास्टरमाइंड असल्याचे म्हटले होते. 11 हजार 280 पानांच्या भारताच्या चार्जशीटमध्ये फहीम अंसारी आणि सबाऊद्दीन अहमद यांनाही आरोपी बनवण्यात आले होते.
पाकिस्तानला सईदवर कारवाईची इच्छा नाही
पाकिस्तानला हाफीज सईदविरोधात कारवाई करण्याची इच्छाच नसल्याचे या चार्जशीटवरून स्पष्ट झाले आहे. कारण भारताने पाकिस्तानला सर्व पुरावे दिले होते. त्यानंतर तपासासाठी पाकिस्तानचे एक पथक भारतातही येऊन गेले. तरीही ते सईदला गुन्हेगार मानायला तयार नाहीत.
पुढे वाचा - भारताने बोलावले उप-उच्चायुक्तांना