आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan PM Nawaz Sharif Rejects India's Bulletproof Car At SAARC Summit

पाकिस्तानी पंतप्रधानांनी नाकारली भारतीय कार, नेपाळमध्ये दक्षिण आशियाई देशांची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- भारत-पाक सीमेवर पाककडून होत असलेल्या सततच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये होत असलेल्या दक्षिण आिशयाई देशांच्या बैठकीदरम्यान पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतीय बुलेटप्रूफ गाडी वापरण्यास नकार दिला आहे.

पुढील आठवड्यात ही बैठक होत असून या काळात भारतात तयार झालेली गाडी वापरणार नाही, अशी भूमिका शरीफ यांनी घेतली आहे. या बैठकीसाठी सर्वच राष्ट्रप्रमुखांसाठी भारतात तयार झालेल्या बुलेटप्रूफ गाड्या ठेवण्यात आल्या असून शरीफ यांनी मात्र पाकमधून स्वत:ची गाडी घेऊन येण्याचा निर्णय घेतल्याचे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खागानाथ अधिकारी यांनी सांगितले.
अमेरिकेचे अध्यक्ष परदेश दौऱ्यात स्वत:ची गाडी आणतात, अशी पुष्टी अिधकारी यांनी जोडली. येथे २६ आणि २७ नोव्हेंबरला ही बैठक होत असून अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, श्रीलंका, नेपाळ, भारत आणि पाकिस्तान या देशांचे नेते बैठकीत सहभागी होतील.