आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्येच संपते पाकिस्तानी रेल्वेचे डिझेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - एक नाव थार एक्स्प्रेस. दोन रेल्वेगाड्या. एक आपली. ती जोधपूरहून मुनाबावपर्यंत जाते. दुसरी पाकिस्तानच्या कराचीहून खोखरापारपर्यंत (जैसलमेर सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेत अंतिम स्थानक) येते. भारत -पाकिस्तान संबंधांच्या नावाने चालवली जात असलेली ही रेल्वे गाडी सुरू झाली, त्याला १८ फेब्रुवारी रोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. पण दोन्ही गाड्यांच्या व्यवस्थेत जमीन-आसमानाचे अंतर आहे. जोधपूरहून जाणाऱ्या गाडीत प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा महत्त्वाची मानली जाते. तिकीट, तपासणी, पासपोर्ट, व्हिडिओग्राफी आणि व्हिसा याशिवाय गाडीत चढणे तर दूरच, रेल्वेगाडी पाहणेही शक्य नाही. याउलट पाकिस्तानातून चालणाऱ्या गाडीत तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. थार एक्स्प्रेसमधून दर वर्षी भारतात येणारे अब्दुल वाहीद यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तर पाकमधून येणाऱ्या थार एक्स्प्रेसचे डिझेल रस्त्यातच संपले होते.
^
आमच्या देशात या रेल्वे गाडीची स्थिती खूप वाईट आहे. हिंदुस्थानप्रमाणे ना स्थानकावर सुविधा आहेत ना गाडीत कुठली व्यवस्था. दोन वर्षांपूर्वी हैदराबाद- मिरपूरदरम्यान डिझेल संपले. गाडी अनेक तास खोळंबली. प्रवासी भुकेले होते. दुसरे इंजिन आले आणि गाडी पुढे निघाली.
- मिरपूर येथील अब्दुल वाहीद यांनी सांगितल्यानुसार.