आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: सीमेवर पाकने ध्वज खांबाच्या जागी उभारले 400 फूट उंच टॉवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करत भारतविरोधी खोडसाळपणा केला आहे. भारत-पाकिस्तादरम्यान असलेल्या अटारी सीमेच्या काही पावले अंतरावर पाकिस्तानने त्यांच्या हद्दीत कॅमेऱ्याने सुसज्ज असे टॉवर उभारले आहे. काही दिवसांपूर्वी भारताने या सीमेवर आपल्या हद्दीत तिरंग्यासाठी खांब रोवला होता. त्यापेक्षाही उंच खांब उभारण्याच्या बहाण्याने पाकिस्तानने हा खोडसाळपणा केला आहे. भारताच्या ध्वजखांबावेळी पाकिस्तान आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणेने प्रचंड आरडाओरड केली होती. पण पाकिस्तानच्या या खोडसाळपणाचा भारताकडून साधा विरोधही करण्यात आलेला नाही.
  
मार्च २०१७ मध्ये पंजाबचे तत्कालीन मंत्री अनिल जोशी यांच्या पुढाकाराने अमृतसर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने ३५० फूट (११० मीटर) उंच आणि ५५ टन वजनी खांब लावून त्यावर १ क्विंटल वजनी तिरंगा फडकावला होता. यासाठी सुमारे ३.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, देशाच्या सुरक्षेला आव्हान असल्याचा आरोप लावत पाकिस्तानने या ध्वजास प्रचंड विरोध केला होता. त्यांच्या मते ध्वजात कॅमेरे बसवून हेरगिरी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. वास्तविक असा कोणताच प्रकार नव्हता.

 दरम्यान, भारताने उभारलेल्या खांबावर फडकावल्या जाणाऱ्या तिरंग्याचे कापड वारंवार फाटत असल्यामुळे हा ध्वज फडकावणे नंतर बंद करण्यात आले. मात्र, आता पाकिस्तानने खोडसाळपणा सुरू केला आहे. वाघा हद्दीत रिट्रीट सोहळ्याचे ठिकाण असलेल्या दीर्घापासून काही मीटर अंतरावरील उद्यानात झेंडा फडकावण्यासाठी खांब लावायचे सोडून टॉवरच उभे केले आहे. यातून हेरगिरी करण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. गुप्तहेर संस्थांच्या मते, या टॉवरची उंची भारतीय खांबापेक्षा ५० फूट अधिक आहे. 

हा जगातील सर्वात मोठा ध्वज असल्याचा पाकिस्तानी माध्यमांतून दावा करण्यात आला आहे. या टॉवरचे काम पूर्ण झाले असून १४ ऑगस्ट रोजी म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी त्यावर पाकिस्तानी ध्वज फडकावला जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आम्ही याची माहिती सरकारला दिली असून पाकिस्तानकडे आक्षेपही नोंदवला आहे.  

चीनच्या मदतीने ७ कोटींत उभारले टॉवर  
तपास संस्थेच्या मते, पाकिस्तानने हे टॉवर चीनच्या मदतीने बनवले असून त्यासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यावर लावण्यात आलेल्या अत्युच्च दृश्य क्षमतेच्या कॅमेऱ्यातून फक्त सीमाच नव्हे तर लष्कर   मुख्यालयातील हालचालींवरच लक्ष ठेवता येते. टॉवरवर अनेक जवानांना उभे राहता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...