आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील राजपूत फॅमिलीची लग्झरी लाईफ, बॉडीगार्ड ठेवतात AK-47

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरकोट संस्थानाचे युवराज करणीसिंह. - Divya Marathi
अमरकोट संस्थानाचे युवराज करणीसिंह.
राजसमंद (राजस्थान)- भारताला महासत्ता होण्यासाठी पाकिस्तानची साथ असणे गरजेचे आहे. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण भावनेने एकत्र येऊन समस्येवर तोडगा शोधला पाहिजे, असे मत आहे पाकिस्तानमधील अमरकोट संस्थानचे राणा हमीरसिंह यांचे. एका विवाह सोहळ्यासाठी हमीरसिंह गुरुवारी राजसमंद येथे आले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानातील हिंदूंची सुरक्षा पाकिस्तानी मुस्लिम करत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्या बॉडीगार्डकडे AK-47 रायफल्स आहेत.

आणखी काय म्हणाले हमीरसिंह
- त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतूक केले आणि टाळी काही एका हाताने वाजत नसल्याचे सांगितले.
- दोन्ही देश आपसात लढत राहिले तर तिसरा त्याचा फायदा उचलणार. दोघांनी मित्र म्हणून एकत्र बसून समस्येवर उत्तर शोधले पाहिजे.
- पाकिस्तानमध्ये 97 टक्के मुस्लिम आणि फक्त तीन टक्के इतर धर्मिय आहेत.
- या सर्वांची सुरक्षा पाकिस्तानातील मुस्लिम करतात.
- पाकिस्तानातील मुस्लिम स्वतःला जेमरचा राजा पोरसचे वंशज मानतात.
- हमीरसिंहाचे कुलदैवत हिंगलाज मंदिराची सुरक्षाही मुस्लिमांकडेच असल्याचे त्यांनी सांगितले.

कोण आहे हमीरसिंह
- हमीरसिंह यांच्या कुटुंबाचे पाकिस्तानातील राजकारणात वजन आहे.
- त्यांचे वडील राणा चंद्रसिंह अमरकोटचे राजे होते.
- चंद्रसिंह सात वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. त्यांचे पाकचे माजी पंतप्रधान जुल्फीकार अली भुट्टोंसबत मैत्रीचे संबंध होते.
- पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधून वेगळे झाल्यानंतर राणा चंद्रसिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टी स्थापन केली होती. त्यांचा झेंडा भगवा होता.
- त्यात ओम आणि त्रिशूल होते. त्यांचे 2009 मध्ये निधन झाले.

भारतीय आहे हमीरसिंहची सून
20 फेब्रुवारी 2015 रोजी हमीरसिंह यांच्या मुलाचा विवाह राजस्थानच्या पद्मिनीसोबत झाला होता.
- वऱ्हाड पाकिस्तानच्या अमरकोट संस्थानातून भारतात आले होते.
- वर होता हमीरसिंहाचा मुलगा करणीसिंह आणि वधू होती कानोता (जयपूर)चे ठाकूर मानसिंह यांची मुलगी पद्मिनी.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मोदींबद्दल काय म्हणाले हमीरसिंह..