आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात अशी आहे राजपूत फॅमिलीची LIFE, बॉडीगार्डकडे असते AK-47

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातील रॉयल राजपूत फॅमिलीचे प्रिन्स करनीसिंह. सोबत बंदूकधारी बॉडीगार्ड. - Divya Marathi
पाकिस्तानातील रॉयल राजपूत फॅमिलीचे प्रिन्स करनीसिंह. सोबत बंदूकधारी बॉडीगार्ड.
जयपूर - भारत-पाकिस्तान फाळणीनंतर अनेक संस्थाने पाकिस्तानमध्ये विलिन झाले होते. त्यातीलच एक आहे अमरकोट संस्थान. या संस्थानाचे प्रिन्स करनीसिंह सोढा आहेत. यांची पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांसोबत नियमीत उठ-बस असते. सोशल मीडियावर त्यांचे शिकारीवर गेले असतानाचे अनेक फोटो सापडतात. ते कुठेही जातात तेव्हा त्यांच्यासोबत बंदुकधारी बॉडीगार्ड असतो. बॉडीगार्डकडे AK-47 रायफल्स असते.
कशी आहे ही पाकिस्तानातील रॉयल राजपूत फॅमिली...
कोण आहे हमीरसिंह
- हमीरसिंह यांच्या कुटुंबाचे पाकिस्तानातील राजकारणात वजन आहे.
- त्यांचे वडील राणा चंद्रसिंह अमरकोटचे राजे होते.
- चंद्रसिंह सात वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. त्यांचे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फीकार अली भुट्टोंसबत मैत्रीचे संबंध होते.
- पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधून वेगळे झाल्यानंतर राणा चंद्रसिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टी स्थापन केली होती. त्यांचा झेंडा भगवा होता.
- त्यात ओम आणि त्रिशूळ होते. त्यांचे 2009 मध्ये निधन झाले.
भारतीय आहे हमीरसिंहांची सून
- 20 फेब्रुवारी 2015 रोजी हमीरसिंह यांचा मुलगा करनीसिंहचा विवाह राजस्थानच्या पद्मिनीसोबत झाला होता.
- वऱ्हाड पाकिस्तानच्या अमरकोट (वर्तमानात त्याला उमरकोट म्हणतात) संस्थानातून भारतात आले होते.
- वर होता हमीरसिंहाचा मुलगा करणीसिंह आणि वधू होती कानोता (जयपूर)चे ठाकूर मानसिंह यांची मुलगी पद्मिनी.
पुढील स्लाइडमध्ये पाहा रॉयल फॅमिलीची भारतीय सून आणि राणा चंद्रसिंह, हमीरसिंह
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...