आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताचेही प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानी लष्कराने सोमवारी शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करताना जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी भागात जोरदार गोळीबार केला. लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने सकाळी साडेआठ वाजेपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना कृष्णा घाटी परिसरात गोळीबार सुरू कला आहे. भारतही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गोळीबार सुरूच होता. पाकिस्तानने गेल्या १२ तासांत पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी लष्कराने शनिवारीही राजौरीच्या नौशेरा आणि सुंदरबनी या भागात एलओसीवरील भारतीय चौक्यांवर उखळी तोफांनी भडिमार तसेच गोळीबार केला होता. त्यात बीएसएफचा एक जवान आणि एक महिला असे दोघे जखमी झाले होते. त्यानंतर रविवारीही गोळीबार करण्यात आला.
एक जवान शहीद, एक जण जखमी
बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने रविवारी रात्री राजौरी भागात एलओसीवर केलेल्या तोफांच्या हल्ल्यात राय सिंग (४०) हा बीएसएफचा हेड कॉन्स्टेबल जखमी झाला होता. त्याचा सोमवारी मृत्यू झाला. एक जवान गंभीर जखमी आहे, तर चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. राय सिंग हे हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...