श्रीनगर - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशीरा पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील भारतीय चौकीवर हल्ला केला. त्यानंतर भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. आजपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये अडथळा निर्माण हा गोळीबार करण्यामागचा उद्देश आहे. दहशतवादी दरवर्षी या यात्रेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात अशतात. त्यासाठी पाकिस्तान भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसवण्याच्या प्रयत्नात असतो.
भारताचे चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या सैनिकांनी बुधवारी रात्री 12.35 वाजता पुंछच्या भीमभेर आणि गली-गंभीर यौ चौकींवर हल्ला केला. त्यानंतर भारताकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्हा बाजुने रात्री 1.30 पर्यंत गोळीबार सुरू होता. याआधी 17 आणि 18 जून तसेच 13 जूनलाही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावर्षी एप्रिल मे महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे 19 प्रकार समोर आले आहेत.
2013 मध्ये 200 पेक्षा अधिक
भारत पाकिस्तानदरम्यान 2003 मध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघनाचा करार झाला होता. पण त्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तणुकीत काहीही फरक पडलेला नाही. गेल्या 10 वर्षांत 500 पेक्षाही अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. गेल्या वर्षीच असे सुमारे 200 प्रकार घडले.
फाईल फोटो : जम्मू-काश्मिरमध्ये निगराणी करणारे भारतीय जवान