आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan Violates Ceasefire Again; Nightlong Firing From Across LoC

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताबा रेषेवर पाक सैन्याची जमवाजमव, पुन्हा गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची/जम्मू - पाक सैनिकांच्या कुरापतींमुळे सीमेवर तणाव वाढत चालला असून ताबा रेषेनजीक पाकिस्तानने आणखी जवान तैनात केले आहेत. दरम्यान, पाकच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्याचे स्वातंत्र्य भारतीय लष्कराला असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी म्हटले आहे.

पाच भारतीय सैनिकांच्या हत्येबद्दल केंद्र सरकारची भूमिका काय, असे विचारले तेव्हा कोचीमध्ये बोलताना अँटनी म्हणाले, ‘अशा प्रश्नांची उत्तरे तर संसदेतच दिली जाऊ शकतात.’ मात्र, ताबा रेषेवर पाकिस्तानी सैनिकांच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले.

पाकचा पुन्हा गोळीबार : रविवारी रात्री दीडच्या सुमारास पाक सैनिकांनी पुन्हा गोळीबार केला. 7 हजार राउंड या वेळी फायर करण्यात आले. शिवाय रॉकेट आणि तोफगोळ्यांचाही भारतीय हद्दीत मारा करण्यात आला. गेल्या 48 तासांत दुसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकने केले.

भारतीय उपायुक्तांना पाचारण
इस्लामाबाद : मुजोर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागले यांना बोलावून भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबाराबद्दल नाराजी व्यक्त केली. पाकचा एक जवान ठार झाल्याचा दावाही या वेळी करण्यात आला.

पाकमध्ये भारतविरोधी ठराव
पाकच्या पंजाब असीम्ब्लित भारताने ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा निषेध करणारा ठराव सोमवारी पारित करण्यात आला. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर न्यावा, अशी मागणीही ठरावात आहे. विशेष म्हणजे या प्रांतात पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याच पक्षाचे सरकार असून त्यांचा लहान भाऊ शाहबाज मुख्यमंत्री आहे.