आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात पाकची आगळीक सुरूच; गोळीबारात एक जवान शहीद, 9 वर्षीय मुलीचाही मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकच्या गोळीबारात नायक मुदस्सर अहमद शहीद झाले. - Divya Marathi
पाकच्या गोळीबारात नायक मुदस्सर अहमद शहीद झाले.
श्रीनगर - जम्मू आणि काश्मिर लगत सीमेजवळ पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकने सोमवारी पुन्हा राजौरीच्या मांजाकोट सेक्टरमध्ये गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला असून एक महिला सुद्धा जखमी आहे. तर दुसरीकडे, काश्मिरच्या पूंछ येथील नियंत्रण रेषेवर सुद्धा पाकचा गोळीबार थांबलेला नाही. यामध्ये एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सीमेवर तैनात भारतीय जवानांनी या गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिला आहे. 

भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर
- पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजौरीच्या नॅका परिसरातील मांजाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. यामध्ये नायक मुदस्सर अहमद शहीद झाले. तसेच एक स्थानिक महिला देखील जखमी झाली. तिला उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. 
- संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पाकिस्तानी लष्कराने पूंछ जिल्ह्यातील बालाकोटच्या भिंबर गल्ली सेक्टरमध्येही फायरिंग केली. यात अवघ्या 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 
- पाक आर्मीकडून सोमवारी सकाळी 7:30 वाजता छोट्या स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला. तसेच उखडी तोफांनी सुद्धा हल्ले करण्यात आले. यास भारतीय जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...