आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाककडून 24 तासांत दुस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 5 चौक्यांवर फायरींग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
जम्मू - पाकिस्तानने 24 तासांमध्ये दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाक रेंजर्सने जम्मू जिल्ह्याच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये गुरुवारी पहाटे चार वाजता बीएसफच्या 5 चौक्यांना लक्ष्य केले. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. ही फायरिंग सकाळपर्यंत सुरू होती. त्यापूर्वी पाकिस्तानकडून बुधवारीही जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावेळी मोर्टार फायरिंगमध्ये एका महिलेचा मृत्यूदेखिल झाला होता. तसेच बीएसएफच्या जवानांसह तीन जण जखमी झाले होते.

मोदी-शरीफ यांच्या प्रत्येक भेटीवेळी सीमेवर होता तणाव
13 महिन्यांत तीनवेळा भेटले मोदी आणि शरीफ. मात्र या काळात पाकिस्तानने 500 पेक्षा अधिकवेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
1. मे 2014 : 26 मे रोजी मोदी पंतप्रधान बनले. शपथविधीसाठी शरीफ यांना बोलावणे पाठवणे. पाकिस्तानचे लष्कर आणि कट्टरतावादी दौऱ्याच्या विरोधात असूनही शरीफ भारतात आले. मोदींनी शरीफ यांच्या आईसाठी शॉल भेट म्हणून पाठवली.
2. जून : शरीफ यांनी मोदींच्या आईसाठी साडी पाठवली.

3. जुलै : एका महिन्यानंतर पाकिस्तानने सीमेवर फायरिंग केली. त्यात दोन जवान शहीद झाले.
4. ऑगस्ट : पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतली. त्याच्या विरोधात इस्लामाबादमध्ये होणारी परराष्ट्र सचिवांची चर्चा भारताने रद्द केली.
5. सप्टेंबर : नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्राचे सचिव बान की मून यांच्या भेटीत काश्मीर मुद्दा उचलला. भारताने त्याचा विरोध केला.
6. ऑक्टोबर : एलओसी आणि सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या फायरिंगनंतर 8 नोव्हेंबर 2014 ला जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एक जवानही शहीद झाला होता.
7. नोव्हेंबर : मोदी-नवाज नोव्हेंबरमध्ये सार्क परिषदेदरम्यान भेटले. पण दोन्ही देशांत औपचारिक चर्चा झाली नाही.
8. मार्च 2015 : परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांची भेट घेतली. 2012 नंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ होती.
9. जून : मोदी बांगलादेश दौऱ्यावर असताना त्यांनी पाकिस्तान ही भारतासाठी डोकेदुखी असल्याचे म्हटले. तसेच म्यानमारच्या कारवाईनंतर अशीच कारवाई शेजारी देशांमध्ये करू असा इशारा दिला. पाकिस्नाने त्याचा विरोध केला.
10. जुलै : परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानने अणुबॉम्ब शब-ए-बारातसाठी राखून ठेवलाय का? असा सवाल केला. तर त्यानंतर त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी गरज पडल्यास पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करेल असे म्हटले.

11. 5 जुलै : नौगाम सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात बीएसएफच्या एक जवान शहीद झाला. तर इतर तीन भागांमध्ये पाकिस्तानने फायरींग केली.

12. 7 जुलै : पाकिस्तानने जम्मूपासून 20 किलोमीटर अंतरावर अरनिया सेक्टरमध्ये बीएसएफच्या 6 चौक्यांवर फायरींग केले.

13. 9 जुलै : मोदी-शरीफ यांच्या भेटीपूर्वी पाकिस्तानने नॉर्थ काश्मीरच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये फायरींग केले. त्यात बीएसएफचा जवान शहीद झाला. त्यानंतर काही तासांतच मोदी-नवाज यांच्यात रशियामध्ये अनौपचारीक चर्चा झाली.
बातम्या आणखी आहेत...