आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO - चर्चेनंतरही पाकिस्‍तानने फायरिंग थांबवली नाही तर सडेतोड उत्‍तर : भारत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पा‍किस्‍तानने एकाच महिन्‍यात सहा वेळा फायरिंग केली. त्‍यामुळे नागरिकांच्‍या रागाचा भडका उडाला आहे. पाहण्‍यासाठी क्लिक करा. - Divya Marathi
पा‍किस्‍तानने एकाच महिन्‍यात सहा वेळा फायरिंग केली. त्‍यामुळे नागरिकांच्‍या रागाचा भडका उडाला आहे. पाहण्‍यासाठी क्लिक करा.
जम्मू - सीमेपलीकडून पाकिस्‍तान वारंवार फायरिंग करत आहे. ती त्‍यांनी थांबवावी, यासाठी त्‍यांच्‍यासोबत चर्चा केली जाणार आहे. चर्चेनंतरही त्‍यांनी फायरिंग थांबवली नाही तर पाकिस्‍तानला सडेतोड उत्‍तर देण्‍यासाठी आम्‍ही सक्षक आहोत, असे प्रतिपादन विदेश सचिव एस. जयशंकर यांनी दिली. आज (गुरुवार) झालेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ड्रोन चिनी बनावटीचे
जयशंकर म्‍हणाले, पीओकेमध्‍ये पाडलेला ड्रोन भारताचा नाही. तो चिनी बनावटीचा आहे. पाकिस्‍तानच्‍या आर्मीने बुधावारी भारताचा ड्रोन पाडल्‍याचा दावा केला होता. या ड्रोनचा फोटोही इंटर सर्व्‍हीसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) ने प्रसिद्ध केलेला आहे. आयएसपीआरच्‍या माहितीनुसार, पाकव्‍याप्‍त काश्मिरमध्‍ये पाकिस्तानी सैनिकांनी हा ड्रोन पाडल्‍याचा दावा केला आहे. पण, भारताने त्‍याचे खंडण केले आहे, अशी माहितीसुद्धा त्‍यांनी दिली.
उच्‍चस्‍तरीय बैठकीनंतर जयशंकर यांची पत्रकार परिषद
आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू-काश्मीर येथे पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवसात झालेल्या शस्त्रसंधीचे उल्‍लंघन केले गेले. त्‍यांना सडेतोड उत्‍तर देण्‍यासाठी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकयेथील गृह मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंह, परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्‍वराज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजि‍त डोभाल सहभागी झाले होते.
असे आहेत पाकिस्‍तानचे कारनामे
मागील 24 तासांत पाकिस्‍तानने दोन तर एका महिन्‍यात सात वेळा शस्‍त्रसंधींचे उल्‍लंघन केले. दरम्‍यान, सहा दिवसांपूर्वी रशियामधील उफा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली होती. त्‍यात महत्‍त्‍वाच्‍या विषयावर चर्चा झाली होती. पण, उलट पाकिस्‍तानकडून शस्‍त्रसंधींचे उल्‍लंघन आणि भारतावर खोटे आरोप केले जात आहेत.
मोदी-शरीफ जेव्‍हाही भेटले तेव्‍हा तेव्‍हा पाकिस्तानने कुरापती केल्‍या
1. पहिली भेट : 26 मे, 2014 ला मोदी यांच्‍या शपथ ग्रहण समारोहात त्‍यांची शरीफ यांच्‍यासोबत पहिली भेट झाली. त्‍यावेळी पाकिस्‍तान सैन्‍य आणि धर्मांध संघटनांनी या दौ-याचा विरोध केला. त्‍यानंतर एकाच महिन्‍यामध्‍ये पाकिस्‍तानने केलेल्‍या फायरिंगमध्‍ये दोन जवान शहीद झालेत.
2. दुसरी भेट : 27 नोव्‍हेंबर, 2014 नेपाळमधील सार्क परिषदेत. या महिन्‍यात पाकिस्‍तानने जम्मू-कश्मीरच्‍या उडीमध्‍ये फायरिंग केली. यात एका महिलेलाचा मृत्‍यू झाला होता. शिवाय एक जवान शहीद झाला.
3. ति‍सरी भेट : 10 जुलैला रशियाच्‍या उफा शहरात तिसरी भेट झाली. यापूर्वी 5 जुलैला नौगाव सेक्टरमध्‍ये पाकिस्तानचे फायरिंग केली यात एक जवान शहीद झाला. दरम्‍यान, इतर तीन भागातही पाकिस्तानने फायरिंग केली. 7 जुलैला पाकिस्तानने जम्मूपासून 20 किलोमीटर दूर अरनिया सेक्टरमध्‍ये बीएसएफच्‍या सहा पोस्टवर फायरिंग केली. 9 जुलैला नॉर्थ कश्मीरच्‍या बारामुला सेक्टरवर फायरिंग केली. यामध्‍ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला. त्‍यानंतर पाकिस्‍ताने चार वेळा शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा पाकिस्‍तान कुठे केली फायरिंग