आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Violates Ceasefire, Indian Troops Retaliate

शस्त्रसंधी मोडली : पाकिस्तानकडून कुरापत, भारतीय चौक्यांवर गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरूच असून मंगळवारी लष्कराने शाहपूर भागातील भारतीय चौक्यांना गोळीबार करून लक्ष्य केले. हल्ल्याला भारतीय लष्कराने परतवून लावले. घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

मंगळवारी सकाळी 11 वाजता भारतीय जवान गस्तीवर असताना ही घटना घडली. सरहद्दीवर पाकिस्तानी फौजांनी गोळीबार सुरू केला. त्यावर भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी जवानांनी गोळीबार बंद केला. लष्कराने त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली. जुलैमध्ये पाकिस्तानकडून आठ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले होते. गोळीबाराच्या घटनांचा फायदा घेऊन घुसखोरी करण्याचाही प्रयत्न झाला. या अगोदर जूनमध्ये पाच वेळा, एप्रिलमध्ये 19 वेळा हल्ला झाला होता.

दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त, दहा किलो आयईडी जप्त
लष्कर तसेच पोलिसांनी मंगळवारी एका संयुक्त कारवाईत किश्तवाडच्या वनात दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केले. घटनास्थळी दहा किलो आयईडी जप्त करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार होता, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. एके 47 रायफल, 148 राउंड काडतुसे , एक चायनीज पिस्टल, 303 रायफलचे 15 राउंड, रेडिओ, चार ग्रेनेड, एक आरपीजी रॉकेट, सात यूबीजीएल ग्रेनेड आणि लष्कराचे लेटर पॅडही जप्त करण्यात आले.

जम्मू-काश्मीर सीमेनजीक नियंत्रण रेषेवर हाफिज सईदच्या रॅली
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा हाफिज सइद याने जम्मू-काश्मीर सीमेवर नियंत्रण रेषेच्या जवळ सभा घेतल्या. अलीकडेच त्याने जमात-उद-दावाच्या आमीरसोबत अनेक ठिकाणी सभा घेतल्या. गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी लोकसभेत लेखी स्वरूपात ही माहिती दिली. हाफिज मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माइंड आहे आणि भारतात तो मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे. पाकिस्तानने दहशतवादाच्या विरोधात कडक पावले उचलून हाफिजच्या या भारतविरोधी कारवायांना लगाम घातला पाहिजे.