आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Warns Against Deals Done By India America

पाकचा जळफळाट, म्हणे भारत अमेरिकेदरम्यान झालेल्या करारांचे परिणाम वाईट होतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍या दरम्यान झालेल्या काही करारांमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढण्याची शक्यता पाकिस्तानने व्यक्त केली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना पाकिस्तानने म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षेसंदर्भातील हित पाहणे याचा संपूर्ण अधिकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. भारत अमेरिकेदरम्यान झालेल्या अणु नागरी सहकार्य करारावरून संतापून पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली.

राष्‍ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र प्रकरणातील पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजिज म्हणाले की, अणु करार अमलात येण्याने दक्षिण आशियामध्ये स्थैर्य आणि अण्वस्रांचा वापर न करण्याच्या बंधनावर परिणाम होऊ शकतो.
अजिज यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारताच्या समावेशासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही विरोध केला आहे. 48 सदस्यांच्या एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याची भारताची क्षमता असल्याचे ओबामा म्हणाले होते. पण अजिज मात्र भारताच्या समावेशासाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्याच्या विरोधात आहेत.