आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरठमधून पाकिस्तानच्या ISI च्या एजंटला अटक, भारतीय लष्कराच्या हेरगिरीचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शनिवारी भारतीय लष्कराची हेरगिरी करण्याच्या आरोपात एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आसिफ अली आहे. तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट असल्याची दाट शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ अलीकडून लष्करासंबंधीत अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. एसटीएफने त्याला दिल्ली गेट येथून अटक केली आहे. त्याच्या हलचाली संशयास्पद वाटत होत्या. त्याच्याकडे पाकिस्तानच्या बँकेचे पासबुक आणि डेबीट कार्ड सापडले आहे.
प्रतिकात्मक चित्र