आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रमात पाकिस्तानी लोकांंकडून भारतीय जवानांवर दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांनी बीटिंग रिट्रीट कार्यक्रमादरम्यान भारतीय बीएसएफच्या जवानांवर दगडफेक केली. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात घोषणा दिल्या. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. सुदैवाने यात एकही जखमी झाला नाही.

न्यूज एजन्सी एएनआयनुसार, वाघाबॉर्डरवरील या घटनेनंतर बीएसएफच्या अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने पाकिस्तानी रेंजर्ससोबत फ्लॅग मीटिंग बोलावली. पण, त्याचा उपयोग झाला नाही.

आता बीटिंग रिट्रीटदरम्यान उपस्थित राहात नाही भारतीय लोक...
- 29 सप्टेंबरला बीएसएफने अटारी-वाघा बॉर्डरवरील 'बीटिंग रिट्रीट' सेरेमनी रद्द केली होती. पण, रविवारी सायंकाळी नागरिकांना सहभागी न करुन घेता उभय देशांच्या लष्कराने ही कार्यक्रम घेतला.
- अमृतसरपासून 30 km अंतरावर हा चेक पोस्ट आहे. या रिट्रीटमध्ये बीएसएफचे जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स सहभाग घेतात.
- 30 मिनिटांचा हा कार्यक्रम पाहाण्यासाठी दोन्ही देशांचे लोक, पर्यटक दररोज सायंकाळी वाघा बॉर्डरवर हजेरी लावतात.


'सर्जिकल स्ट्राइक'मुळे संताप...
- 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर दोन्ही देशामध्ये तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम रविवारी सायंकाळी वाघा बॉर्डरवर दिसून आला.
- 18 सप्टेंबरला चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीतील लष्कराच्या तळावर हल्ला केला होता. त्यात 19 जवान शहीद झाले होते.
- या हल्ल्याच्या 10 दिवसांनी आर्मीच्या स्पेशल फोर्सचे 125 कमांडोज हेलिकॉप्टरने एलओसीजवळ उतरले.
- कमांडोजनी हातावर चालत PoK मध्ये घुसले आणि 4 भागातील दहशतवादयाचे 7 तळ उद्‍ध्वस्त केले. या कारवाईत 38 दहशतवादाचा खात्मा करण्यात वआला होता.

पुढील स्लाइडवर वाचा, 2 दोन वर्षापूर्वी वाघा बार्डरवर स्फोटात ठार झाले होते 60 लोक
बातम्या आणखी आहेत...