आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Flags Seen In Shri Nagar On Pak Independence Day

15 ऑगस्टच्या सोहळ्यापूर्वी श्रीनगरमध्ये लावले पाकचे झेंडे, मीरवाइज नजरकैदेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगरमध्ये लावण्यात आलेला पाकिस्तानी झेंडा. - Divya Marathi
श्रीनगरमध्ये लावण्यात आलेला पाकिस्तानी झेंडा.
श्रीनगर - शुक्रवारी पाकिस्‍तान स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मात्र त्याचवेळी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्येही अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे आढळून येत आहेत. फुटीरतावादी नेत्या दुख्तरन-ए-मिल्लतच्या प्रमुख आसिया अंद्राबी यांनी खुलेआम पाकिस्तानचा झेंडा फडकवला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले.
या प्रकारांमुळे जम्मू-काश्मीरच्या काही भागांमध्ये म्हणजे खानयार, नावहाटा, रैनवारी, एमआर गंज, मैसूमा, साफा कदाल याठिकाणी काही निर्बंध लादण्यात आले आहेत. फुटीरतावाद्यांना पाकचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यापासून रोखण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. हुर्रियत कॉन्फरन्चे अध्यक्ष मीरवाइज उमर शेख यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय सीआरपीएफ आणि पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्याही शहरातीत विविध भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र लिहून देशविरोधी तत्वांचा निपटारा करण्यास सांगितले आहे.

उच्चायुक्तांचे भडक वक्तव्य
पाकिस्तान उच्चायुक्तालयात शुक्रवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यात आला. उच्चायुक्त अब्दुल बासीत म्हणाले की, पाकिस्तान नेहमीच भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसेच जोपर्यंत काश्मिरी नागरिकांना त्यांचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तान त्यांची बाजू घेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना पाकिस्तान कायम मदत करत राहील असेही ते म्हणाले.

मिठाईची देवाण घेवाण नाही
गेल्या काही दिवसांत सीमारेषेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे वाढलेले प्रकार आणि दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा वाढलेलला सहभाग यामुळे दोन्ही देशांच्या नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी सीमेवर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये मिठाईची देवाण घेवाणही होणार नाही. मात्र याच महिन्यात 23 तारखेला दिल्लीत चर्चा होणार आहे. त्यात दहशतवादावरही चर्चा होणार आहे.

मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ट्विट करून पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
@narendramodi
Greetings & good wishes to the people of Pakistan on their Independence Day.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photo's