आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...अन् टेंशनमध्ये मायदेशी परतल्या पाकिस्तानी तरुणी; म्हणाल्या, \'नमस्कार, फिर मिलेंगे\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) घुसून दहशतवादी तळांवर 'सर्जिकल स्ट्राइक' केले. दहशवाद्यांच्या 7 तळावर हल्ला करून भारतीय जवानांनी 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर भारत-पाकच्या सीमेवर प्रचंड तणाव निर्माण आहे. युद्धसदृष्‍य स्थिती निर्माण झाली आहे.

पण, दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव असतानाही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी विद्यार्थिनी भारत भेटीला आल्या होत्या. भारत भेटीने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आय लव्ह इंडिया, आपण पुन्हा भेटूया...
सहा दिवस भारतात राहिल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थिनी सोमवारी मायदेशी परतल्या. जाता-जाता त्या म्हणाल्या की, भारतीय लोक खूप प्रेमळ आहेत. आय लव्ह इंडिया, आपण पुन्हा भेटूया...'

आणखी काय म्हणाल्या पाकिस्तानी गर्ल्स....
'ग्लोबल यूथ पीस फेस्ट-2016'चा सोमवारी समारोप झाला. यंदा या फेस्टमध्ये 33 देशांच्या दोनशे पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला होता. शेवटच्या दिवशी सर्व देशांतून आलेल्या तरुणांना- एकमेकांना 'अलविदा' म्हटले. दरम्यान, भारतात आम्हाला खूप सुरक्षितता जाणवल्याचे सांगताना पाकिस्तानी तरुणी भावूक झाल्या होत्या. 'बाय-बाय, पुन्हा भेटूया. आय लव्ह इंडिया' असे म्हणत त्या मायदेशी परतल्या.

तरुणींनी साधला 'भास्कर'शी संवाद...
- पाकिस्तानी तरुणींनी चंदीगडमध्ये 'भास्कर'शी संवाद साधला होता. मुलींंनी सांगितले की, दोन्ही देशातील जनतेला युद्ध नव्हे शांतता हवी आहे.
- भारतातील पर्यटन स्थळे त्यांना खूप आवडल्याचेही त्या म्हणाल्या. भारतीयांकडून त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले, सन्मान मिळाल्याचे पाकिस्तानी विद्यार्थिनींनी सांगितले.


नेमके कशासाठी आल्या होत्या या तरुणी...
- पाकिस्तानी ‍विद्यार्थिनी 11 व्या ग्लोबल यूथ पीस फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेण्यासाठी चंदीगडला आल्या होत्या. सर्व विद्यार्थिनींचे गुरुकुल ग्लोबल स्कूलने जोरदार स्वागत केले होते.
- भारतीय विद्यार्थिनींनी पाकिस्तानी तरूक्षींना घास भरवून त्यांना शांतीचा संदेश दिला.

भारतीय विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पाकिस्तानी संस्कृती...
Q. पाकमध्ये प्राण्याची कुर्बानी का दिली जाते?
- प्राण्यांची कुर्बानी दिली जाते हे खरे आहे. पण, जे लोक गरीब आहेत. त्यांना खायला मिळत नाही, अशा लोकांमध्ये हे वाटले जाते. इस्लाम धर्मग्रंथात 'कुर्बानी'चा उल्लेख करण्यात आला आहे.

Q. पाकमध्ये वेस्टर्न ड्रेसेस परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे?
- होय, पण सलवार- कमीज हा आमचा पारंपरिक पेहराव आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 11व्या ग्लोबल यूथ पीस फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या तरुणींचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...