आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Jawan Firing On Indian Border To Help Terrorist Infiltration

पाकिस्तानकडून रात्रभर सीमेवर जोरदार फायरिंग, स्पेशल कमांडो केले तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यापूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. काल (गुरुवार) रात्रीपासून आज (शुक्रवार) सकाळपर्यंत पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवर जोरदार गोळीबार केला. सांबा सेक्टरमधील सुचेतगड परिसरात सर्वाधिक गोळीबाल करण्यात आला. भारताकडून बीएसएफने प्रत्युत्तर दिले. बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने सीमेवर स्पेशल कमांडो तैनात केले आहेत.
घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल
बराक ओबामा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने सीमेवर 110 स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो तैनात केले आहेत. आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबा रेषेवरही कमांडो तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानकडून कमांडो कधी भारतीय सीमेवर तैनात केले जात नाहीत. भारतीय लष्कराच्या जवानांचे शीर कापण्याचा प्रकार असो किंवा कारगील युद्ध पाकिस्तानकडून या कमांडोंचा वापर झाला आहे. कारगील युद्धाच्या वेळी भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक कमांडो ठार झाले होते. भारतीय लष्कराने सीमेपलिकडून केले जाणारे सॅटेलाईट फोन इंटरसेप्ट केले आहेत. त्यातून पाकिस्तानचा उद्देश स्पष्ट होत आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, धोका वाढला, शाळांना सुट्या...