आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मूमध्ये पाक कैदी सनाउल्लाहचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - जम्मूमध्ये कोट भलवाल तुरुंगात भारतीय कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला पाकिस्तानी अतिरेकी सनाउल्लाहचा चंदिगडच्या रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाने पाठवण्यात आला.


गेल्या 3 मे रोजी हा हल्ला झाला होता. पाकिस्तानच्या तुरुंगातील हल्ल्यात मृत्यू झालेला भारतीय कैदी सरबजितवर अंत्यसंस्कार सुरू असताना सनाउल्लाहवर भारतीय कैद्याने प्राणघातक हल्ला केला होता. डॉक्टरांनुसार, रुग्णालयात दाखल केले तेव्हाच सनाउल्लाह ब्रेन डेड होता. गुरुवारी त्याचे अवयव निकामी होत गेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 52 वर्षीय सनाउल्लाहला 1999 मध्ये दहशतवादविरोधी कायद्यान्वये अटक झाली होती. त्याच्यावरील हल्लेखोर कैदी विनोदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव भारताने पाकला पूर्वीच दिला आहे. भारतात 272 पाक कैदी असून, पाकमध्ये 532 भारतीय आहेत.