आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गस्ती पथकावर पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार; जवान शहीद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू/श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी रेंजर्सनी एका गस्ती पथकावर गुरुवारी गोळीबार केला. यात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. भारतीय लष्कराच्या  प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या तीन चौक्या उद्ध्वस्त झाल्या, तर दोन रेंजर्स जखमी झाल्या. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ला चढवला. यात बीएसएफचा कॉन्स्टेबल तपन मंडलचा मृत्यू झाला.  ३१ ऑक्टोबर रोजीही पाक लष्कराने पूंछ जिल्ह्यातील करमारामध्ये, तर २६ ऑक्टोबर रोजी केरनी सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.

इंटरनॅशनल बॉर्डरवर अचानक झाले फायरींग... 
न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार बीएसएफच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सने सकाळी सुमारे साडे 9 वाजता इंटरनॅशनल बॉर्डरवर अचानक बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर गोळीबार केला. या घटनेत कॉन्स्टेबल तपन मंडल गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. बीएसएफच्या पीआरओंनी सांगितले की, कॉन्स्टेबल तपन मंडल पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सातुल गावचे राहणारे होते. हा हल्ला झाला तेव्हा पथक पहलगामकडे चालले होते. 

31, 26 आणि 18 ऑक्टोबरलाही केली फायरींग... 
- यापूर्वी 31 ऑक्टोबरला पुंछ जिल्ह्याच्या करमारामध्ये LoC वर पाकिस्तानकडून छोट्या शस्त्रांद्वारे फायरिंग करण्यात आले होते. त्यात 13 वर्षांची एक मुलगी जखमी झाली होती. 
- 26 ऑक्टोबरलाही पाकिस्तानच्या केरनी सेक्टरच्या शेर शक्ती आणि मंधार एरियामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. 
- 18 ऑक्टोबरला पाकिस्तानने पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात फायरिंग केले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर मोर्टार शेलचा माराही करण्यात आला होता. त्यात 2 वर्षांच्या मुलासह 8 नागरिक जखमी झाले होते. 

3 वर्षांत 183 जवान शहीद 
नोयडाचे आरटीआय अॅक्टीव्हीस्ट रंजन तोमर यांच्या एका अर्जावर गृह मंत्रालयाने नुकतेच उत्तर दिले होते. त्यात गेल्या तीन वर्षांत काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत 183 जवान शहीद झाले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याशिवाय 62 नागरिकही मारले गेले. हा आकडा आंकडा मे 2014 पासून मे 2017 पर्यंतचा आहे. 

काश्मीरमध्ये 275 दहशतवादी अॅक्टीव्ह 
न्यूज एजन्सीने काही दिवसांपूर्वी सुत्रांच्या हवाल्याने म्हटले होते की, काश्मिरमध्ये सुमारे 275 दहशतवादी अॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 250 फक्त पीर पंजाल रेंजमध्ये आहेत. 2017 मध्ये आतापर्यंत 291 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 80 यशस्वीही झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...