आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistani Refugees Raped The Minor Daughter Jodhpur Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तानी शरणार्थीचे दुष्कर्म उघड, गर्भवती मुलीचा गळा आवळून घरातच पुरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाप (जोधपूर)- राजस्‍थानातील एका पाकिस्तानी शरणार्थीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून ‍तिची हत्या केल्याची घडना उघडकीस आली आहे. नराधम पित्याने पीडित मुलीवर तब्बल सहा महिन्यांपर्यंत लैंगिक शोषण केले. यात पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिची गळा आवळला आणि तिला घरात पुरल्याचे स्पष्ट झाले.
पीडितेच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.


पो‍लिसानी मंगळवारी बंद खोलीत खोदकाम करून जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला. आज (बुधवार) मृहतेहाचे पोस्‍टमार्टम करण्यात आले. पीडिता गर्भवती असल्याचे स्पष्‍ट झाले आहे.

फलौदीचे सीआय अन्नराजसिंह राजपुरोहित यांनी सांगितले, की मुळचा पाकिस्तानातील सांगड येथील गुलबहार ओड याने मंगळवारी जोधपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ राजेश उर्फ बशीर याने त्याच्या अल्पवयीन मुलीवर सहा महिने बलात्कार केला. मात्र, पीडिता गर्भवती असल्याचे समजताच त्याने 29 मे 2014 रोजी मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह घरातील एका खोलीत पुरला. एका महिन्याच्या आत नराधम आरोपीच्या भावानेच या प्रकाराचा भांडाफोड केला.
आरोपी राजेश हा भुर्जमधील कुंजाल भागात आपल्या कुटूंबियांसोबत राहत होता. त्याच्यासोबत त्याची 14 वर्षीय मुलगीही राहत होती. राजेश झोलाछाप डॉक्टर बनून परिसरातील लोकांवर उपचार करायचा. यादरम्यान तो आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. अशात त्याच्यापासून पीडित मुलीला दिवस राहिल्याचे समजताच त्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. नंतर घरातील एका बंद खोलीस खड्डा खोदून तिच्या मृतदेह पुरला.

पीडितेच्या काकाने पोलिसांना सांगितले, की गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने फोन करून जन्मदेत्या प‍ित्याचे कारस्थानबाबत माहिती दिली होती. पीडितेने काकाला मदतीच्या अपे‍क्षेने फोन केला होता. गुलबहार ओड यांने भाऊ आणि राजेशला समज दिली होती. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर 29 मे रोजी रात्री राजेश याने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. नंतर तिचा मृतदेह आपल्या घरातील एका खोलीत पुरला.

राजेशने गुलबहार यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो दिल्लीला निघून गेला होते. मात्र सोमवारी त्याने एसपीसमोर हजर झाला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केले. चौकशीत राजेशने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी राजेशच्या घरातील खोली उघडून पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
2010 मध्ये आला होता भारतात...
गुलबहारने पोलिसांना सांगितले की, 2010 मध्ये आई-वडील आणि पुतणीला घेऊन तो भारतात आला होता. नंतर त्याचा भाऊ राजेश पत्नी आणि अन्य मुलांना घेऊन भारतात आला. श्रीगंगानगर, विजयनगर व आजूबाजूच्या परिसरात त्याने विटभट्टयावर काम केले. नंतर झोलाछाप डॉक्टर बनून तो कुंजाल गावातील लोकांवर उपचार करत होता.
(फोटो- पोटच्या मुलीचा गळा आवळून तिची हत्या करणारा आरोपी प‍िता)
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, या खोलीत पुरले होते नराधमाने आपल्या मुलीला...