आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Terrorist May Strike On Amarnath Yatra This Year

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, लष्कराने सुरु केले \'ऑपरेशन शिवा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमरनाथ यात्रेतील भाविकांवर आत्मघातकी हल्ला करण्याचा कट पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रचला असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवादी पाठविण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इंग्रजी न्युज चॅनलने ही माहिती दिली आहे. या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा सुरु केले आहे. तसेच केंद्र आणि जम्मू-काश्मिर सरकारला अॅलर्ट राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे आजच (गुरुवार) 5000 यात्रेकरुंची पहिली तुकडी अमरनाथ दर्शनासाठी पोहोचणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हेही यावेळी दर्शन घेतील.
कशी आहे सुरक्षा व्यवस्था
लष्कर-ए-तोयबासह इतर दहशतवादी संघटनेचे 10 ते 15 सदस्य सीमा पार करुन जम्मू आणि काश्मिरमध्ये दाखल झाले आहे. त्यांचा खातमा करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा अंतर्गत 7500 जवान तैनात केले आहे. या दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न हे जवान करणार आहेत. दहशतवादी हल्ला झाला तर त्याला तोंड देण्यासाठीही जवान तयार असल्याचे सांगितले जात आहे. या शिवाय निमलष्करी दलाचे आणि स्थानिक पोलिस विभागाचे 10 हजार पोलिस यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेसाठी असणाऱ्या दोन रस्त्यांवर हे पोलिस तैनात राहणार आहेत. राजनाथसिंह यांनी काल सुरक्षेची माहिती घेतली.
अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या या गुफेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो यात्रेकरुन अमरनाथला जातात. यावर्षी ही यात्रा 59 दिवस चालणार आहे.