जम्मू - पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन झाल्यानंतर भारताने जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर शुक्रवारी तेवढी सीमेवर शांतता होती. शनिवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने डोके वर काढले आहे. पुंछ सेक्टरमध्ये शाहपूर येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सीमेवर अजूनही पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. गुरुवार-शुक्रवारपासून सीमेवर गोळीबार बंद होता. मात्र, शनिवारी दुपारी 12.40 दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताच्या दिशेने गोळीबार केला आहे. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
या आठवड्यात गोळीबारात 8 जण मृत्यूमुखी
या आठवड्यात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्यात 8 जण मृत्यूमुखी पडले आहे, तर 60 हून अधिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून भारतीय सीमवर होत असलेली हा गोळीबार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे.
गुरुवारी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे निवडणूक प्रचारसभेत पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, 'त्यांना चोख उत्तर दिले आहे. पाकिस्तान तोंडावर पडले आहे. त्यांनी आता समजून घेतले पाहिजे भारतात आता सत्ताबदल झाला आहे. पहिल्यासारखे वातावरण राहिलेले नाही. भारतीय सेना आता चोख उत्तर देईल आणि ते देत देखील आहेत.'
याशिवाय देशाचे संरक्षणमंत्री अरुण जेटली पाकिस्तानला गुरुवारी स्पष्ट इशारा देताना म्हणाले होते, 'जर पाकिस्तान शस्त्रसंधीचे असेच उल्लंघन करत असेल तर त्यांना याची किंमत मोजावी लागेल.' यावर पाकिस्तानकडून, उत्तर देण्यास आम्हीही सक्षम असल्याच सांगण्यात आले होते.
(संग्रहित छायाचित्र)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आतापर्यंत झालेल्या गोळीबारात भारतीयांचे झालेले नुकसान