(फाइल फोटो)
जम्मू - जम्मू-काश्मीर सीमेवर सतत पाकिस्तानकडून फायरिंग होत आहे. आत्ता ताज्या बातमीनुसार, रविवारी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेजवळील अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये फायरिंग केली. पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफच्या 15 चौक्यांवर निशाणा साधला. मात्र बीएसएफने पाकिस्तानच्या या गोळीबारीला सडेतोड उत्तर दिले. दुसरीकडे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष बान की मून यांना पत्र लिहून जम्मू-काश्मीर मुद्द्यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी शनिवारी लिहिलेल्या पत्रात एलओसीवर झालेल्या फायरिंगचा उल्लेख केला आहे. सरताज अजीज यांनी या पत्रात भारतील सुरक्षा दलाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचेही म्हटले आहे.
शनिवारीसुध्दा झाली फायरिंग
शुक्रवारी शांत असलेल्या पाकिस्तानने शनिवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने अरनियामधील बीएसएफच्या दोन चौक्यांवर फायरिंग केली. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने मोर्टार आणि शस्त्रांनीही हल्ला केला आहे. पुँछ सेक्टरच्या सीमाभागातील शाहपूरमध्ये शनिवारी दुपारी फायरिंग करण्यात आली.
सईदची नवाज सरकारला विनंती - भारताविरोधात घोषित करा जिहाद
दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचे चीफ हाफिज सईदने पाकिस्तनी सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी भारताविरोधात जिहाद घोषित करावा. सईदने शुक्रवारी एका रॅली दरम्यान भारताकडून झालेल्या फायरिंगवर टीका केली. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार, यावेळी कराची प्रेस क्लबमध्ये सईदसमर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये सर्वच समर्थक भारताविरोधात जिहाद घोषित करावे अशी मागणी करणारे पोस्टर आणि बॅनर दाखवत होते.
या आठवड्यात फायरिंगमध्ये गेले 8 जणांचे प्राण
या आठवड्यात पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये 8 जणांना
आपले प्राण गमवावे लागले आहे, तर 60 जण गंभीर जखमी झाले आहेत. भारताच्या सीमाभागात पाकिस्तानकडून झालेली फायरिंग ही आतापर्यंतची सर्वात मोठी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणारी आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, फायरिंगमुळे जखमी झालेले भारतीय