आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानातून आला तरुण, घेऊन गेला भारतीय तरुणी, वाचा दोन्ही देशातील वास्तव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या कामरानचे भारतीय जरीनावर प्रेम होते. - Divya Marathi
पाकिस्तानच्या कामरानचे भारतीय जरीनावर प्रेम होते.
अटारी (पंजाब)- भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव असला तरी समझोता एक्सप्रेस दोन्ही देशांमध्ये प्रेमाचा संदेश पोहोचविण्याचे काम करत आहे. त्याने दोन्ही देशांमधील जनतेत असलेला कडूपणा काही प्रमाणात कमी होत आहे. भारतातून परत जात असलेल्या 119 प्रवाशांमध्ये पाकिस्तानचा युवक कामरानही आहे. भारतात असलेल्या बरेली येथील जरीनावर त्याचे प्रेम होते. त्यानंतर निकाह करण्यासाठी तो भारतात आला होता. आता दोघे पाकिस्तानमध्ये परत जात आहेत.
भारत-पाकिस्तान तणावावर हे म्हणाला कामरान
- कामरान म्हणाला, की माझी आई बरेलीची आहे. दोन वर्षांपूर्वी मी माझ्या आजीकडे आलो होतो. यावेळी मला जरीना आवडली. तिलाही मी आवडलो.
- दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिल्यावर निकाह पक्का करण्यात आला. बरेलीतच हा निकाह झाला.
- यावेळी कामरान म्हणाला, की दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी नातेसंबंध तर तोडता येणार नाही.
कराचीची निलोफर बेगम पक्की करत आहे निकाह
- पाकिस्तानच्या कराची शहरातील निलोफर बेगम हिने सांगितले, की माझ्या मुलीचे लग्न 17 वर्षांपूर्वी दिल्लीच्या तरुणाशी झाले होते.
- भारतातील नागरिक चांगले आहेत. मी आमच्या भागातील तीन तरुणींचे लग्न येथे केले आहेत.
- आता दोन्ही देशांतील नातलग लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकतात.
- युद्ध आणि द्वेश सरकारने तयार केले आहेत. जनतेला तर शांती हवी आहे.
पुढील स्लाईडवर बघा, भारतात निकाह केल्यावर पाकिस्तानला परतणारे कामरान आणि त्याची पत्नी....
बातम्या आणखी आहेत...