आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसआयशी संबंध, १ अटकेत, महत्त्वाची कागदपत्रे लागली हाती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या संशयित एजंटच्या घरात काही आहेत. ही कागदपत्रे आयएसआयशी संबंधित आहेत. एसटीएफचे अधिकारी म्हणाले, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अख्तर खान आहे. तो कोलिन स्ट्रीट येथे राहतो. त्याच्या घरातून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यात नकली भारतीय नोटादेखील आहेत.
खानला शनिवारी अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्याची १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. १९८५ मध्ये खान कपड्याच्या कारखान्यात काम करण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. तेथे तो विवाह करून स्थायिक झाला; परंतु कारखाना बंद पडला. त्यामुळे तो बेरोजगार झाला. तो बेरोजगार झाल्याने त्याचा तलाक झाला.