आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापले, पुन्हा फडकावले पाकिस्तानचे झेंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- देशात रमजान ईदचा उत्साह शिगेला पोहोचला असताना काश्मीरमध्ये मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना ISIS चे झेंडे फडकावले. यावरून पोलिस आणि फुटीरतावाद्यांमध्ये धुमश्चक्री उडाली आहे.

पोलिसांनी फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी यांना नजरकैदेत ठेवले आहे. यावरून गिलानी समर्थकांनी शनिवारी सकाळी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे तर पाकिस्तानी तसेच ISISचे झेंडे फडकावले. फुटीरतावाद्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

पोलिसांना हटवण्याची मागणी
गिलानी यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेले पोलिस हटवण्यात यावे, अशी मागणी फुटीरतावाद्यांनी केली. पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावताच जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. यात अनेक पोलिस जखमी झाले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

दरम्यान, शुक्रवारी 'जुमे की नमाज'नंतर पोलिस आणि फुटीरतावाद्यांमध्ये बाचाबाची झाली होती. जामा मशिदीबाहेर गिलानी समर्थकांनी पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे फडकावले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...