आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड : नक्षलींनी उडवला रेल्वे ट्रॅक, 35 रेल्वे कर्मचाऱ्यांना बनवले बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/लातेहार - नक्षली बंद दरम्यान मंगळवारी रात्री पाऊणे नऊदरम्यान माओवाद्यांनी स्फोटकांनी रेल्वे ट्रॅक उडवला. त्यामुळे बरकाकानाहून पटण्याला जाणारी पलामू एक्सप्रेस अपघातग्रस्त झाली. रेल्वेच्या इंजिनसह तीन डबे पटरीवरून उतरले. मात्र, कोणतीही हानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. घटनास्थळी मदकार्यासाठी गेलेल्या रेल्वेच्या 35 कर्मचाऱ्यांना माओवाद्यांनी बंदी बनवले आहे.

ही घटना लातेहारच्या छिपादोहर आणि बरवाडीहदरम्यान बैरा गावाजवळ घडली. या अपघाताची सूचना मिळाल्यानंतर बरवाडीह स्टेशनहून आरपीएफ आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बरकाकाना आणि बरवाडीह स्थानकावरही गोंधळ सुरू झाला. प्रवाशांच्या नातेवाईकांनी स्थानकावर गर्दी केली. रेल्वे ट्रॅकवर जोरदार स्फोट झाल्याची माहिती रात्री 10 च्या दरम्यान मिळाली.

चालकाने वाचवले अनेक प्राण
अंबाकोठी, लातेहारचे राहणारे प्रवासी रवींद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचालक शिव कुमार, सह चालक जीडी प्रसाद, गार्ड विनोद प्रसाद यांच्या समयसूचकचेमुळे मोठा अपघात टाळता आला. रेल्वे बैरा गावाजवळ पोहोचताच एक जोरदार स्फोट झाला. त्यानंतर लगेचच चालकाने रेल्वे थांबवली. त्यामुळे जास्त डबे पटीवरूनही उतरले नाहीत.

गरीबरथ, जम्मूतावी एक्सप्रेस डायव्हर्ट
स्फोटाची सूचना मिळताच रांची-दिल्ली गरीबरथ आणि लातेहार, टाटा-हटिया जम्मूतावी एक्सप्रेस टोरी स्थानकावरच थांबवण्यात आल्या. नंतर दुसऱ्या मार्गाने या रेल्वे वळवण्यात आल्या. तर बनारसहून संबलपूरला जाणाऱ्या रेल्वे सकाळपर्यंत अडकल्या होत्या.

रिलीफ ट्रेनलाच बंदी बनवले
बंदी बनवलेल्या बरवाडीह स्थानकाचे व्यवस्थापक टी. मुर्मू यांनी भास्करशी बोलताना सांगितले की, ते 35 जणांच्या टीमसह रात्री 11.20 वाजता बरवाडीहहीन रिलिफ ट्रेनसह घटनास्थळाकडे जात होते. त्यावेळी घटनास्थलापासून सुमारे तीन किलोमीटर आधी टॉर्चचा उजेड दिसला. पटरीच्या आसपास हा उजेड दिसत होता. त्यामुळे रेल्वे थांबवली तर 30-35 नक्षली आले. ते रेल्वेत चढले आणि रेल्वे त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तसेच ट्रेन हलवल्यास सर्वांना गोळी मारण्याची धमकी दिली.

पोलिसांना बोलवल्यानंतरच इथून जाता येईल असे त्यांनी सांगितेल. त्यानंतर ते सगळे शांतपणे रेल्वेत बसले. त्यानंतर डॉ. एस.के.लाल यांच्यासह पाच जणांचे पथक घटनास्थळी जात होते. पण नक्षलींनी त्यांनाही अडवले. त्या सर्वांनाही रिलिफ ट्रेनमध्ये आणून बसवले. नक्षलींच्या धमकीनंतर एआरटी पायलट सुनील कुमार एवढे घाबरले होते की, त्यांनी रेल्वे चालवायलाच नकार दिला. सगळे नक्षलींच्या ताब्यात असून चांगलेच घाबरलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...