आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इडापड्डी के. पलानीसामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री, बहुमतासाठी 15 दिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - जवळपास १० दिवसांच्या राजकीय पेचानंतर तामिळनाडूला  नवे मुख्यमंत्री मिळाले. इडापड्डी के. पलानीसामी यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनावर पद  व गोपनीयतेची शपथ दिली. पलानीसामी यांच्यासोबत ३१ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. ९ महिन्यांतील राज्याचे हे तिसरे मुख्यमंत्री आहेत.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात १४ फेब्रुवारी रोजी सर्वाेच्च न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अण्णाद्रमुकच्या नेत्या शशिकला यांनी १५ वर्षांपासूनचे सहकारी पलानीसामी यांचे नाव पुढे केले. त्यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड केली. पलानीसामी यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला व १२४ आमदारांची यादी सोपवली. पलानीसामींना २३४ सदस्यांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, पलानीसामी गुरुवारीच विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ठराव मांडतील.

दरम्यान, पलानी यांच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय पेचावर तूर्त पडदा पडला आहे.
पलानी म्हणाले, तामिळनाडूमध्ये जयललिता यांचे सरकार सुरू राहील. यानंतर ते जयललिता व एमजीआर यांच्या स्मारकावर गेले. मे २०१६ मधील निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. डिसेंबरमधील  निधनानंतर त्यांचे निकटवर्तीय पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री केले. शशिकला यांचे नाव पुढे आल्यानंतर पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा दिला व ९ महिन्यांत तिसऱ्या मुख्यमंत्र्याच्या रूपात पलानीस्वामी यांनी राज्याचे नेतृत्व स्वीकारले आहे.

पन्नीर गटाची निवडणूक आयोगाकडे धाव :
बंडखोरीनंतर पक्षातून बडतर्फ केल्यानंतर पन्नीरसेल्वम गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. राज्यसभा खासदार व्ही. मैत्रेयन यांच्या नेतृत्वाखाली १२ नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांची भेट घेतली. ४२ पानांच्या निवेदनात शशिकला पक्षाच्या प्राथमिक सदस्य नसल्याने त्यांची निवड अवैध असल्याचा दावा केला.
 
नव्या मुख्यमंत्र्यांकडे १२ विभागांचा कारभार
नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी एकूण १२ विभाग स्वत:कडे ठेवले आहेत. यात अर्थ व सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत. पन्नीरसेल्वम यांच्या मंत्रिमंडळातही हे विभाग त्यांच्याकडे होते.

जयललितांच्या समाधीवर नतमस्तक होऊन तुरुंगात गेल्या शशिकला... पुढील स्लाइडवर क्लिक करून व्हिडिओतून पाहा घटनाक्रम... आणि पन्नीरसेल्व्हम म्हणाले, केवळ 11 आमदार पाठीशी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...