आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palau Nation Donated Dimond Coins To Lord Tirupati Balaji

पालाऊ देशाकडून तिरुपती बालाजीवर हिरेजडित नाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- देशभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजीची लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचली आहे. प्रशांत महासागरातील पालाऊ या बेटावरील देशाने बालाजीची प्रतिमा असलेली नाणी तयार केली आहेत.
तिरुपती बालाजीचे हे नाणे स्फटिक, हिरे, चांदीने घडवण्यात आले आहे. त्याची विक्री बुधवारपासून कोलकात्यामध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती नाणे-पदकाचे अभ्यासक अलोक गोयल यांनी दिली. तिरुमला वेंकटेश्वरा मंदिर सामान्यपणे तिरुपती बालाजी म्हणून परिचित आहे. बालाजीच्या सेवेत अशा प्रकारचे नाणे परदेशात तयार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे नाणे 11 हजार 111 रुपयांना मिळेल. नाण्याची आवृत्ती मर्यादित आहे. ही नाणी विशेष नक्षीदार डब्यात ठेवण्यात आलेली आहेत.