आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांचा आरोप करुन तरुणीला काळे फासले, बुटांचा हार घालून काढली धिंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला (हरियाणा)- अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पंचायतीने तरुण आणि तरुणीला काळे फासून बुटांचा हार घालून गावात धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी ही घटना घडली. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाने याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सरपंच, फोटोग्राफर यांच्यासह काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
चेहऱ्याला काळे फासले, बुटांचा हार घातला
- येथील बलदेव नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे बरनाला येथील तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. तरुणीचे आधीच लग्न झाले आहे. तिने प्रेमविवाह केला होता.
- पतीला बेशुद्धीचे औषध देऊन तरुणी बॉयफ्रेंडला घरी बोलवायची. त्यानंतर दोघे शारीरिक संबंध ठेवायचे.
असा झाला खुलासा
- काही दिवसांपूर्वी गावातील काही तरुण भल्या पहाटे शेतीतून घरी जात होते. यावेळी त्यांना संबंधित तरुण तरुणीच्या घरी असल्याचे दिसून आले. त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले.
- त्यानंतर गावातील पंचायत भरवण्यात आली. गावकऱ्यांनी दोघांच्या चेहऱ्यावर काळे फासले. त्यांच्या गळ्यात बुटांचा हार घातला.
- गावातील महिलांनी तरुणीला मारहाण केली. तिला शिव्या दिल्या. त्यानंतर दोघांची गावातून धिंड काढण्यात आली.
पुढील स्लाईडवर बघा... गावातील महिलांनी तरुणीचे असे मुस्काट फोडले.... तरुणालाही मारहाण केली... बघा संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...