आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Orders Rape Victim To Accept Two Lakh Rupees And Abort Baby

बलात्कार पीडित मुलीला पंचायतीचे फर्मान, \'दोन लाख घे अणि गर्भपात कर!\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर/पाटणा - मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका गावातील पंचायतीने बलात्‍काराच्या पीडित एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भातील बाळाची दोन लाख रुपये किंमत लावली दोन लाख रुपये घेऊन गर्भपात करून घेण्याचा आदेश पंचांनी या मुलीला दिला आहे. मुजफ्फरपूरमधील कांटी येथील शुभंकरपूर गावातील हा प्रकार आहे.
आरोपीची धमकी
ही 13 वर्षीय पीडित मुलगी 25 मे रोजी दुकानातून सामान आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अरुण भगत नावाच्या एका व्यक्तीने तिला पकडले. त्याने मुलीवर बलात्कार केला आणि कोणाला सांगू नये म्हणून धमकी दिली. आठवडाभरापूर्वी या मुलीला पोट दुखण्याचा त्रास होऊ लागला. तिची आई मुलीला दवाखान्यात घेऊन गेली, त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण समोर आले. मुलगी गरोदर असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी मुलीकडे विचारणा केली, त्यावेळी तिने नातेवाईकांना सर्व काही सांगितले. हळू हळू याबाबत सगळीकडे वृत्त पसरले. त्यानंतर आरोपी अरुण भगतने पीडितेचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने आरडाओरड केली तेव्हा तीचे प्राण वाचले.
पंचायतीचा तुघलकी कारभार
पीडितेचे नातेवाईक कांटी येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्याठिकाणी कोणीही त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर 23 सप्टेंबरला गावात पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीने तुघलकी आदेश देत अरुण भगतकडून दोन लाख रुपये मिळून जातील असे सांगितले. पंचांच्या या आदेशाने पीडितेचे नातेवाईक नाराज झाले. अरुण भगतवर कारवाई करून त्याला कडक शिक्षा द्यावी असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. गावक-यांनीही अरुणला शिक्षा व्हावी असे मत व्यक्त केले आहे. पोलिस मात्र आपल्याकडे तक्रारच आली नसल्याचे म्हणत आहेत.