आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchayat Strange Decision Villager Swap His Wife With Other Man Hapur

पुतण्याने काकूला पळवले; पंचायतीचा काकाला आदेश, \'त्याची बायको तू ठेव\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ/हापूड (उत्तर प्रदेश) - हापूड जिल्ह्यातील एका गावात पंचायतीने अजब निर्णय दिला आहे. पुतण्याने काकूला कथितरित्या पळवून नेल्यानंतर, पंचायतीने काकाला आदेश दिला आहे, की तू पुतण्याच्या बायकोला तुझ्या जवळ ठेवून घे. त्यासोबतच पंचायतीने फर्मान दिले आहे, की काकाने आदेशाचे पालन केले नाही तर, त्याला गाव सोडावे लागेल. त्यानंतर काकाने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की पंचायतीने असा आदेश दिला असेल तर पंचायत सदस्यावर कडक कारवाई केली जाईल.
उत्तर प्रदेशातील बाबूगड पोलिस स्टेशनअंतर्गत आजमपूर गावातील ही घटना आहे. येथील सतीश सैनी नावाच्या युवकाचे मेरठच्या युवतीसोबत लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडू लागले. दोघांमध्ये कायम वाद होत होता. दरम्यान, युवतीचे सतीशचा पुतण्या सोनूसोबत कथितरित्या सुत जुळले. सोनू देखील विवाहित आहे. सोनू आणि सतिशची पत्नी 3 ऑगस्ट रोजी फरार झाले. सतिशच्या पत्नीने पाच वर्षांच्या मुलाला देखील सोबत नेले आहे.
गावातील पंचायतीने 26 ऑगस्ट रोजी हा अजब निर्णय दिला आहे. पंचानी सतिशला त्याच्या पत्नीच्या बदल्यात सोनूच्या पत्नीला स्विकारण्याचा आदेश दिला. तसेच सोनूचे कुटुंबीय सतिशला 10 हजार रुपये नुकसान भरपाई देतील असे देखील आश्वासन दिले.
छायाचित्र - प्रतिकात्मक छायाचित्र

पुढील स्लाइडमध्ये, या घटनेसंबंधीचे छायाचित्र