आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूमध्ये बनवत होते खवा अन् पनीर, खरेदी करण्याआधी पाहा हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुनानगर- दिवाळीला तुमच्या घरी पोहोचणारी मिठाई अत्यंत घाणीत बनवण्यात येत होती आणि ती अजीबात खाण्याच्या लायकीचे नव्हते. याचा खुलासा सीएम फ्लाइंगच्या टीमने केलेल्या छापेमारीत झाला आहे. सकाळी 11 वाजता टीमने चनेटी रोडवरील गोदामात छापा टाकला. येथे अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यात येत होत्या. येथे बाथरूमध्ये पनीर बनवण्यात येत होते आणि कपड्यात लपेटून बाथरूमध्येच ठेवण्यात येत होते. अनेक कुंटलच्या मिठाईवर बुरशी चढली होती. ती सर्व मिठाई जाग्यावरच नष्ट करण्यात आली. टीमने तेथून एक डझन सॅम्पल जप्त केले आहे.

टीमला पाहून गौऱ्यांमध्ये लपवली मिठाई...
- टीम 11 वाजेच्या सुमारास गोदामात पोहोचली तेव्हा कामगारांनी मिठाईचे डब्बे गौऱ्यांच्या ठिगाराखाली लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, टीम ने त्यांना लपवताना पाहिले.
- आत जाऊन पाहिले, तर सर्व प्रकारच्या मिठाई उघड्यावरच ठेवण्यात आल्या होत्या. ज्या टोपल्यात रसगुल्ले ठेवले होते त्याच टोपल्यात माशा मरून पडलेल्या होत्या. मिठाई बनवण्यासाठी घरगूती सिलेंडरचा वापर करण्यात येत होता. या ठिकाणाहून 8 घरगूती सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. 
- या प्रकरणी एएफएसई बिजेन्द यांच्या तक्रारीवरून चरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
- येथे मिठाई बनवणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे लायसन्स काढलेले नव्हते. यावर बोलताना भूषण यांनी सांगितेल की त्याचा प्लॅट चरणसिंह यांना किरायाने दिलेला होता. तोच येथे मिठाई तयार करत होता. आठ महिण्यांपासून मिठाई बनवण्यात येत होती आणि ती दुकानादारांना सप्लाय देखील करण्यात येत होती. रसगुलल्ला 100 रूपये किलो तर, गुलाब जामुन 120 रूपये किलोने विकण्यात येत होते. लाडू 80 रूपये किलोने विकले गेले.
- चरण सिहं यांनी सांगितले की ते दूध बाहेरून विकत घेत होते. त्याचा खवा तयार करून मिठाई बनवण्यात येत होती.
 
गोदामातील बुरशीयुक्त माल केला नष्ट...
- गोदामात टीमने चार कॅन रसगुल्ले, दोन कॅन पाक, 20 किलो लाडू, 10 किलो लोनी आणि 15 किलो लोनी नष्ट करण्यात आले आहे. टीमने तेथे बनलेल्या मिठाईचे एक डझन सॅम्पल घेण्यात घेतले तसेच बीकानेर स्वीटमधून रसगुल्ले, गुलाब जामुन, खवा, पनीर, दालडा, कलाकंद यांचे सॅम्पल घेतले आहे.

सॅम्पलचा अहवाल आल्यानंतर होणार कारवाई...
- डेप्यूटी सिव्हिल सर्जन डॉ. पृथ्वी यांनी सांगितले की अत्यंत घाणीमध्ये मिठाई तयार करण्यात येत होती. टीम ने या ठिकाणाहून अनेक सॅम्पल घेतले आहेत. ते तपासासाठी चंदीगड येथे पाठवण्यात आले आहे. 25 दिवसात त्याचा रिपोर्ट येईल.

पुढील स्लाइडवर पाहा अशा जागेवर बनत होती दिवाळीची मिठाई....
बातम्या आणखी आहेत...