आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच घरातून निघाले ४६ साप, पाहाणाऱ्यांची बसली पाचावर धारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाजीपूर (उत्तर प्रदेश) - येथील एका घरातून एक-एक करत ४६ साप निघाल्याने संपूर्ण गाव भयभीत झाले आहे. गारुड्याने बिन वाजवताच एक-एक करत जेव्हा साप बाहेर यायला लागले तेव्हा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपल्याही घरात सापांनी घर केले नसेलना, या विचाराने लोक भयभीत झाले होते. ज्या घरातून साप निघाले त्या घराबाहेर दिवसभर गर्दी झाली होती.  
 
तीन दिवसांपूर्वी दिसला होता साप 
- गाजीपूरमधील बोगना गावातील कांता राजभर म्हणाल्या, 'काही दिवसांपूर्वी घरात एक साप दिला होता. बरीच शोधाशोध केल्यानतंरही त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी माझा लहान मुलगा विनोदच्या बायकोच्या पायांवर एक साप चढला होता.'
- 'गेल्या दोन दिवसांमध्ये ५ साप दिसले होते. यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. त्यासाठी गारुडी बोलावला. त्याने बिन वाजवताच साप निघायला लागले. एक-एक करत तब्बल ४६ साप निघाले.'
- 'साप निघाल्यानंत गारुडी त्यांना पकडून मारत होता. अखेर त्याच्या हाती एक मोठा नाग लागला. बऱ्याच मेहनतीनंतर त्याला पकडण्यात यश आले.'
- दरम्यान, लखनऊ येथील प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. अनुपम गुप्ता यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की बिन वाजवल्याने साप कधीही बाहेर येत नाही. गारुडी साप बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बऱ्याच गोष्टी करत असतात. त्यातून लोकांना वाटते की बिनच्या आवाजाने साप बाहेर आला. परंतू सापाला कान नसतात. त्यामुळे आवाज ऐकून तो बाहेर येऊ शकत नाही. 

टीप : पुढील फोटो हे भयावह वाटू शकतात...