आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या टॉयलेटमध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, स्वच्छता कर्मचार्‍यावर संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- गुडगाव पाठोपाठ हरियाणातील पानीपतमध्ये एका शाळेतील 9 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील ‘द मिलेनियम’ शाळेत हा प्रकार झाला आहे. अज्ञात नराधमाने मुलीला शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्‍याचा प्रयत्न केला. पोलिसांना स्वच्छता कर्मचार्‍यावर संशय आहे.

मिळालेली माहिती अशी की, शाळा प्रशासनाने हे प्रकरण तब्बल 13 तास दाबून ठेवले. काल (बुधवार) रात्री पावणे नऊ वाजता पीडित मुलीच्या आई-वडिलांनी अज्ञान व्यक्ती आणि शाळा प्रशासनाच्या विरोधात महिला पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री शाळेचे प्राचार्य आणि अध्यक्षांची कसून चौकशी केली. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुडगावमील रायन स्कूलच्या टॉयलेटमध्ये एका 7 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती.

कंबर आणि मानेवर ओरबडल्याचे व्रण.....
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडिता मॉडल टाऊन भागात राहाते. ती द मिलेनियम शाळेत इयत्ता चौथीत शिकते. बुधवारी तिची परीक्षा होती. तिच्या वडिलांनी सकाळी 7.40 वाजता तिला शाळेत सोडले. नंतर 9.30 वाजता शाळेतूद त्यांना फोन आला. 'तुमची मुलगी रडत आहे.' असे त्यांना सांगण्यात आले.
 - आई- वडील तिला घरी घेऊन आले. आईने तिचे कपडे बदलले तेव्हा तिची मान आणि कमरेवर ओरबडल्याचे दिसले. आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने आपबिती सांगितली.
- डीएसपी विद्यावती यांनी सांगितले की, ''पीडिता सकाळी 8 वाजता टॉयलेटमध्ये गेली होती. तितक्यात एक हिरव्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला व्यक्ती तिच्या मागे टॉयलेटमध्ये घुसला. त्याने पीडितेचे तोंड दाबले आणि तिची छेड काढू लागला. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करू लागला. यादरम्यान पीडितेची मान आणि कमरेला ओरबडल्याचे व्रण उमटले. इतकेच नाही तर याबाबत कुठे वाच्चता केल्यास जीवे ठार मारेल, अशी धमकीही दिली.
- आरोपीने पीडितेचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला असावा, अशी शंका पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी रात्री उशीरा केली चौकशी...
- पोलिस पथकाने रात्री शाळेत कारवाई केली. स्वच्छता कर्मचार्‍यांची चौकशी केली.
- पोलिसांनी सर्वात आधी शाळेत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. परंतु स्वच्छता गृहाबाहेर एकही कॅमेरा न बसवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस हिरवा रंगाचे टी-शर्ट परिधान केलेल्या कर्मचार्‍याचा शोध घेत आहेत.
- प्राचार्य विनीता तोमर यांना पोलिसांनी रात्री शाळेत बोलावले होते. परंतु थोडा वेळ थांबल्या आणि नंतर घरी निघून गेल्या.
- शाळा प्रशासनाने पोलिसांना सांगितले की, शाळेत 5 स्वच्छता कर्मचारी काम करतात. सगळ्यांना रात्री शाळेत बोलवण्यात आले होते. त्यापैकी एकावर पोलिसांना संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शाळेत शिकवते पीडित मुलीची मावशी...
- मिलेनियम शाळेत मुलीची मावशी ही शिक्षिका आहे.
- पीडित मुलगी टॉयलेट बाहेर आल्यानंतर तिने वर्ग शिक्षिकेला आपबिती सांगितली होती. परंतु शाळेने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

घटनेशी संबंधित फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...